प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
घाटंजी .कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणूक मध्ये एकता पत्रकार संस्थेचे अध्यक्ष कैलास कोरवते हे ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती जमाती मधून
विजयी झाले तर एकता पत्रकार संस्थेचे सदस्य नंदकिशोर डंभारे सहकार संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटातून विजयी झाल्या बद्दल एकता पत्रकार संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित दोन्ही संचालक यांच्या पत्रकार भवन कार्यालयात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एकता पत्रकार संस्थेचे उपाध्यक्ष कज्जुम कुरेशी सल्लागार गणेश भोयर अरविंद चौधरी सचिन कर्नेवार अरविंद जाधव बंडू तोडसाम अरुण कांबळे व वसीम खान इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
