निराधार निराश्रित व्यक्ती विभागाच्या अध्यक्ष पदी मीनाक्षी सावळकर
यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक कार्याचा आढावा आढावा घेऊन व सामान्य लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ तसेच समाजसेवा या सर्व बाबीचा सरासार विचार करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या अध्यक्षा राधिका मखमले तसेच प्रज्ञाताई गायकवाड महाराष्ट्रातील सर्व सेलच्या प्रमुख यांनी टिळक भवन दादर, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभहस्ते “पदग्रहण सोहळा” समारंभात माझी “यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित व्यक्ती विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देण्यात आलेली जबाबदारी मुळे आपण समाजातील जनतेसाठी कार्य करण्याकरता, तसेच जनतेच्या वेळोवेळी संपर्क राहण्याकरता देण्यात येत असून आपण या जबाबदारीचा स्वीकार केला आहे.
माझी माझी सामाजिक भूमिका समजून मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली . ही नियुक्ती केल्याबद्दल व माझ्यावर विश्वास दाखवल्या बद्दल मी वरील सर्वांचा अत्यंत आभारी आहे,
मी माझ्या सदर पदाच्या कारकिर्दीत आपल्या सेलला योग्य दिशा व गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर असेल अशी ग्वाही देतो.
डॉ.प्रा.मीनाक्षी सावळकर अध्यक्ष
निराधार निराश्रित व्यक्ती विभागाच्या यवतमाळ जिल्हा
