ग्रामीण पोलिसांची गावठी दारू भट्टीवर धाड
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चांदापुर शिवार येथे धाड टाकून सुरू असलेल्या गावठी दारूची हातभटटीची मिळून आली यात एकूण मोहामाच सड़वा 810 लीटर व गावठी दारु 60 लीटर व इतर साहित्य असा एकूण 1,45,130 रु चा मुद्देमाल मिळून आला यात तीन आरोपींना अटक करण्यात आली या मध्ये गावठी दारू हातभट्टी गाळणारे आरोपी सुरेश सीताराम जाधव ,संतोष उकंडा राठोड, रामा भोजू शिंदे सर्व रा चांदापुर येथील असून या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तुनकलवार यांचे मार्गदर्शना झाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकने पोलीस उपनिरीक्षक सुजाता मनवर, जमादार कैलास लोथे, ज्ञानेश्वर मातकर, कुणाल पोलपीलेवार, संजय राठोड, राहुल बोन्द्रे, गजानन गोड़म्बे इत्यादींनी हि कारवाई केल्याने अनेक अवैद्य दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे,अशाच प्रकारची दुसरी कारवाई जोडमोहा बीट मध्ये पोलीस उपनिरीक्षक उताणे यांच्या उपस्थतीमध्ये करण्यात आली.
