Home यवतमाळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने ” पाडवा पहाट...

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने ” पाडवा पहाट ” कार्यक्रमाचे आयोजन

9

देवळी ता.प्रतिनिधी सागर झोरे

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने ” पाडवा पहाट ” कार्यक्रमाचे आयोजन

चैत्र शुक्ल प्रतिपदेला मराठी नववर्षाची सुरुवात करण्याकरिता देवळी शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी नवीन वर्षाचे आगमनाचे स्वागत करण्याकरिता दिनांक २२ मार्च ला सकाळी ४ वाजता गांधी चौक,दत्त मंदिर जवळ ” चेतन सुवांकुर “जीवनाशी संघर्ष करणाऱ्या अंध मुलांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.तरी सर्व जनतेने या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करावा अशी देवळीकर जनतेला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक दिनेश क्षीरसागर यांचे कडून विनंती करण्यात आलेली आहे .

Copyright ©