Home यवतमाळ ज्या कुळात स्त्रीचा छळ होतो त्या कुळाचा नाश होतो-सौ दुर्गा बाभुळकर (पाटिल)

ज्या कुळात स्त्रीचा छळ होतो त्या कुळाचा नाश होतो-सौ दुर्गा बाभुळकर (पाटिल)

11

यवताळम प्रतिनिधी

ज्या कुळात स्त्रीचा छळ होतो त्या कुळाचा नाश होतो-सौ दुर्गा बाभुळकर (पाटिल)

अधक्ष्या श्रम साफल्य बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था 

जागतिक महिला दिनी आयोजित श्रम साफल्य बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था सुरेश नगर (मोहा) धामणगाव रोड यवतमाळ येथे महिला दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना.सौ दुर्गाताई बाभूळकर पाटील यांनी स्त्री विषय भूमिका विशद करताना म्हणाल्या की दिनांक ८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्याचे कारण की दरवर्षी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे इतिहासात डोकावला तर मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्ल्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या नंतर 1910 मध्ये भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला.यानंतर दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली यापुढे म्हणाल्या की ज्या कुळात महिलांना कष्ट सोसावे लागतात, ज्या कुळात स्त्रीचा छळ होतो त्या कुळाचा नाश होतो अश्या त्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाल्या. सौ मनीषा काटे म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात महिलांनी आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनाचे तसेच आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले होते. या कार्याची दखल घेण्यासाठी यंदा लैंगिक समानतेसाठी नाविन्य आणि तंत्रज्ञान या संकल्पने अंतर्गत जागतिक महिला दिन 2023 साजरा केला जाणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर चंद्रशेखर देशपांडे म्हणाले की आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे यासाठी एवढेच म्हणणे की. सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर” या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी सौ मनीषा काटे,डॉक्टर श्री चंद्रशेखर देशपांडे,श्रीकांत उरकुडे,श्री रवींद्र बाभुळकर, तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ दुर्गा रवींद्र बाभुळकर, सचिव संध्या श्रीकांत उरकुडे,सभासद सौ जयश्री चंद्रशेखर देशपांडे व श्रीकांत वंजारी उपस्थित होते

Copyright ©