अंगणवाडी संघटनांच्या कृती समीतीने बेमुदत राज्यव्यापी पुकारलेल्या सपांला – आशा व गटप्रवर्तक संघटनेचा पांठीबा
दि.20 फेब्रुवारी 2022 पासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका-मदतनिस यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला असुन अंगणवाड्या बंद करून सर्व शेवीका व मदतनीस संपात सहभागी झालेल्या आहेत. या संपाला आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या राज्य कमेटीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे तसेच या संपकाळात सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी त्यांना सहकार्य करायचे आहे असेही ठरविण्यात आले आहे. त्याच्या न्याय मागण्यासाठी संप पुकारला असुन शासनाने त्यांच्या न्याय मागण्या ताबडतोब निकाली काढाव्यात अशी मागणी आहे. अन्यथा त्यांच्या संप आंदोलनात संघटना सहभागी होणार आहे. सदर संपामुळे गरोदर मातेचा आहार , स्थनदा मातेचा आहार , झीरो ते तीन वर्षे वयोगटातील मुलांचा आहार , तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचा आहार बंद झालेला आहे.कुपोषण कमी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका – मदतनीस यांचेवर असुन सुद्धा त्यांनाच तुटपुंज्या मानधनात वेठबिगारी सारखे जिवन जगावे लागत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या मुळे कुपोषण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, तसेच सदर संप काळात शासनाने आशा व गटप्रवर्तक महीलांना अंगणवाडी सेविकांची कामे करण्यासाठी आर्थिक आमीषे दाखवून कामे करण्याचे आवाहन केले तरीसुद्धा अंगणवाडी सेविकांची कुठलेही कामे आशा व गटप्रवर्तक महींलांनी करू नये असेही आवाहन कॉ.दिवाकर नागपुरे , राज्य उपाध्यक्ष, आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना यांनी केले आहे.अशी माहिती प्रसिद्धस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवली आहे.
