Home यवतमाळ मंत्री संजय राठोड यांच्याकडून संत सेवालाल महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

मंत्री संजय राठोड यांच्याकडून संत सेवालाल महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

15

मंत्री संजय राठोड यांच्याकडून संत सेवालाल महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

ग्रामीण भागात सामाजिक – धार्मिक बदल घडवून आणण्यासाठी तसेच समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी लोकगीत, भजन असा प्रबोधनाचा मार्ग अवलंबणारे महान संत, थोर समाजसुधारक संत श्री सेवालाल महाराज यांची आज 284 वी जयंती मंत्रायलात तसेच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी साजरी करण्यात आली.

 

दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला मंत्री संजय राठोड आवर्जून उपस्थित होते.मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री संजय राठोड यांच्यासह आमदार राजेश राठोड,सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन केले.

तर मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, आ.राणाजगजितसिंह पाटील आ.आशिष जयस्वाल, आ.निलेश लंके आदी उपस्थित होते.

Copyright ©