श्रीक्षेञ माहूर – सुरेखा तळनकर
श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताहाची सांगता.
समस्त माहूर वासियांचे वतीने शहारातील आबासाहेब पारवेकर नगरात दि.४ जाने.पासून सुरू झालेल्या श्रीमद् संगीतमय भागवत सप्ताहाची बुधवार दि.११ जाने. रोजी महाप्रसादाने सांगता झाली.
भागवत सप्ताहात श्री श्री श्री १००८ ज्ञानेश्र्वर भारती ऊपाख्य बाळू महाराज काकानी,ग्रंथराज ज्ञानेश्वरी चालक परसराम महाराज,भागवताचार्य हभप रवी महाराज,गणेश महाराज गुरनुले शास्त्री,व्यसनमुक्ती सम्राट गजानन महाराज यांचेसह संगीत अलंकार विवेक महाराज व्यास, विनोदाचार्य रमेश महाराज दुधे, नम्रताताई चव्हाण ( काळे) व शारदासुत खामनकर यांच्या ओजस्वी वाणीतून झालेल्या प्रवचनाचा उपस्थित श्रोत्यांनी लाभ घेतला. हभप डंबारे सर,श्रीरामबुवा सोंडेगावकर,लक्ष्मीबाई सोंडेगावकर,चंद्रशेखर पेंदोर, रामप्यारे महाराज, राम राठोड व वैभव दुमारे यांनीही आपली सेवा अर्पित केली.बुधवार दि.११ जाने.रोजी स.८ ते १० या कालावधीत श्री व ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा भाविक भक्तांनी मोठ्या श्रध्देने लाभ घेतला.
