Home यवतमाळ समर्थ क्रीडा मंडळ द्वारा ८ जानेवारीला क्रॉस कं समर्थ क्रीडा मंडळ द्वारा ८...

समर्थ क्रीडा मंडळ द्वारा ८ जानेवारीला क्रॉस कं समर्थ क्रीडा मंडळ द्वारा ८ जानेवारीला क्रॉस कंट्री स्पर्धा ट्री स्पर्धा

14

 

प्रतिनिधी
समर्थ क्रीडा मंडळ यवतमाळ द्वारा व बीपीएड कॉलेज व आनंदवन परिवार यांच्या सहकार्याने योगाचार्य स्व. बापू सहस्रबुद्धे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ ला भव्य क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ जानेवारीला सकाळी ठीक ६.३०ला नेहरू स्टेडियम येथून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष खुल्या गटासाठी दहा किमी, महिला खुला गट ५ किमी व १६ वर्षातील मुले ३ किमी असे गट राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण रुपये तीस हजारांची रोखबक्षीचे व स्मृतिचिन्हे दिले जाणार आहे. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक किंवा अविनाश जोशी (९८२२२२८७५२) डॉ. राजेंद्र क्षीरसागर(९४२०११८६२६) जय मिरकुटे(९१३०३७३८२८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन स्पर्धा संयोजक राजू जॉन यांनी केले आहे.

Copyright ©