Home महाराष्ट्र श्रीकृष्ण ज्ञान मंदिर यवतमाळ येथे भव्य रौप्य महोत्सवाचे आयोजन

श्रीकृष्ण ज्ञान मंदिर यवतमाळ येथे भव्य रौप्य महोत्सवाचे आयोजन

12

प्रतिनिधी हिवरी
महानुभव पंथीय श्रीकृष्ण ज्ञान मंदिर बोरुंदिया नगर यवतमाळ येथे 27, 28 डिसेंबर 2022 ला रौप्य महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या वेळी अनेक धार्मिक कार्यक्रम होत असून 27 डिसेंबरला त्रिमूर्ती मंगल स्नान विडा अवसर वस्त्र अर्पण गीता पाठ श्री पंचवतार उपहार विधी प्रारंभ व सायंकाळी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे श्री पंचकृष्ण पूजन व महाआरती पूजन विधी माननीय अमोलजी येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ, डॉ. पवनजी बनसोड जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. डॉक्टर श्रीकृष्णजी पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, मा. दामोधरजी डोलारकर मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यवतमाळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, दुपारी 2 वाजता यवतमाळ शहरांमध्ये भव्य शोभा यात्रेच्या आयोजन असून ही शोभायात्रा हनुमान आखाडा गांधी मार्केट शहर पोलीस स्टेशन नेताजी चौक दत्त चौक जुने बस स्थानक लाठीवाला पेट्रोल पंप या मार्गे मार्गक्रमण करणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परम पूज्य महंत श्री विजयराजदादा पंजाबी जवळा ( खांड) हे करणार आहे प्रस्ताविक परमपूज्य श्री पू. निलेशदादा बिडकर रणाईचे हे करणार आहे 28 डिसेंबरला श्री प्रभूपूजन विधि गीतापाठ ध्वजारोहण स्वागत दीक्षाविधी व धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी
उपाध्य कुलाचार्य परमपूज्य महंत श्रीवर्धनस्थ बिडकर बाबा रणाईचे अध्यक्ष अखिल विश्व महानुभाव परिषद ,कवीश्वर कुलाचार्य विध्वंस बाबा फलटण, अध्यक्ष अखिल भारतीय महाराष्ट्र परिषद कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य महंत श्री कारंजेकर बाबा अमरावती, व इतर अनेक आचार्य संत,महंत या ठिकाणी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय भाऊ देशमुख, माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके, माजी नगराध्यक्ष श्रीमती कांचनताई बाळासाहेब चौधरी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी,
, बाळासाहेब मांगुळकर माजी उपाध्यक्ष जि प यवतमाळ राजेंद्र भाऊ गायकवाड शिवसेना संपर्कप्रमुख श्याम भाऊ जयस्वाल माजी उपाध्यक्ष जि. प.यवतमाळ, संतोष भाऊ ढवळे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ भुतडा जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. यवतमाळ वसंतराव घुईखेडकर सरचिटणीस रा.काँग. मुंबई, प्रवीण भाऊ देशमुख संचालक मार्केटिंग फेडरेशन मुंबई, प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार, हरिहर लिंगनवार बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख, नानाभाऊ गाडबैले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यवतमाळ, नितीन भाऊ मिर्झापुरे जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना, देवाभाऊ शिवरमवार जिल्हाध्यक्ष मनसे, सुजितभाऊ रतनलाल राय माजी नियोजन सभापती नगरपरिषद यवतमाळ, सौ संगीता रवींद्र राऊत माजी नगरसेविका यवतमाळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन महंत रेवेराजबाबाशास्त्री दिल्ली, महंत धनंजय दादा पंजाबी त. ममताताई पंजाबी त.नीलम दीदी बिडकर यांनी केले आहे या भव्य दिव्य कार्यक्रमास राज्यातून अनेक संत महंत आचार्य उपस्थित राहणार असून तरी सदभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओंकार चेके यांनी केले आहे.

मान.संपादक/ प्रतिनिधी
वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध द्यावी हि नम्र विनंती.

Copyright ©