बालरोगतज्ञ संघटना यवतमाळचा पदग्रहण समारंभ संपन्न.
डॉ. गिरीश डवले अध्यक्ष तर डॉ. स्वाती पाटील यांची सचिव पदी निवड.
यवतमाळ बालरोगतज्ञ संघटना 2022-23 नवीन कार्यकारिणी चा पदग्रहण सोहळा रविवार दि. 11नोव्हेंबर 2022 पार हॉटेल हिरा पॅलेस येथे पार पडला यामध्ये डॉ. गिरीश डवले यांनी मावळते अध्यक्ष डॉ. अजय केशवानी यांच्याकडून अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली तर डॉ. स्वाती पाटील यांनी डॉ. स्वप्नील मानकर यांच्याकडून सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. या समारंभामध्ये इंस्टॉलींग ऑफीसर व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र बालरोगतज्ञ संघटना २०२३ चे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील सुप्रसिध्द डॉ. उदय बोधनकर सर, डॉ. अमोल पवार (महाराष्ट्र बालरोग संघटना सचिव),केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. संजय देशमुख, राज्य कार्यकारणी सदस्य
डॉ. पंकज अग्रवाल, यवतमाळच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय रत्नपारखी, आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
अध्यक्ष पद स्विकारतांना डॉ. गिरीश डवले यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा तसेच ह्यूमन मिल्क बँक यवतमाळ येथे चांगल्या प्रकारे कार्यरत व्हावी यासाठी प्रयत्न करणार असा मानस व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. स्वाती पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संजना लाल व डॉ. झबीह खान यांनी केले.
नविन कार्यकारीणी टिम खालील प्रमाणे :
1) अध्यक्ष – डॉ. गिरीश डवले
2) सचिव – डॉ. स्वाती पाटील
3) I P P. डॉ. अजय केशवानी
4) I.P.S. डॉ. स्वप्नील मानकर
5) उपाध्यक्ष – डॉ. रविंद्र चव्हाण, डॉ. सारंग तारक
6) कोषाध्यक्ष – डॉ. सिध्दार्थ कुळकर्णी, डॉ. संजना लाल
7) सहसचिव – डॉ. विशाल चव्हाण, डॉ. लीना मानकर
8) P.R.O. – डॉ. सचिन पाटील
9) सल्लागार समिती – डॉ. वसंत राशतवार, डॉ. जाफर अली जिवानी, डॉ. बी. एस. झवर, डॉ. पी. बी. काळमेघ, डॉ. अनिल लोया, डॉ. विनायक कुळकर्णी, डॉ. संजय रत्नपारखी, डॉ. संजीव जोशी, डॉ. अजय कुसूंबेवाल, डॉ. सुनिल भवरे, डॉ. पी. डी. अग्रवाल, डॉ. विरेंद्र राठोड, डॉ. पी. बी. चव्हाण.
10) विशेष सदस्य – डॉ. धिरज पांगुळ, डॉ. रवि पाटील, डॉ. अमोल खडसे, डॉ. सुबोध तिखे, डॉ. मुझम्मील कोशीश, डॉ. निशांत चव्हाण, डॉ. आशिष पाटील, डॉ. अमित व्यव्हारे, डॉ. अभिजीत गावंडे, डॉ. हरीष तांबेकर, डॉ. बालक्रिष्ण चौधरी, डॉ. अनिल आखरे पाटील, डॉ. झबीह खान.
11) महिला प्रतिनिधी – डॉ. मिनल राशतवार, डॉ. रुपाली साळवे, डॉ. प्राची चक्करवार, डॉ. नाझीया खान, डॉ. ममता डोम्पाळे
12) तालुका समन्वयक – डॉ. अर्जुन जाधव (दिग्रस), डॉ. संजय भांगडे (पुसद), डॉ. मंगेश नरवडे (उमरखेड), डॉ. आर. जी. ठाकरे (बाभुळगाव), डॉ. निकीतेश चव्हाण (नेर), डॉ. प्रशांत बोमपल्लीवार (आर्णी), डॉ. प्रफुल सिडाम (घाटंजी), डॉ. वैशाली सातुरवार (पांढरकवडा), डॉ. मनोज राठोड (दारव्हा), डॉ. शिरीश मानडेकर (वणी)
या समारंभासाठी डॉ. वसंत राशतवार, डॉ. जिवानी, डॉ. पी. बी. काळमेघ, डॉ. अनिल लोया, डॉ. विनायक कुळकर्णी, डॉ. संजीव जोशी, डॉ. संजय रत्नपारखी, डॉ. पी.डी. अग्रवाल, डॉ. विरेंद्र राठोड यवतमाळतील सर्व बालरोग तज्ञ तसेच यवतमाळतील सगळ्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
