अर्धवट नालीचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन
व्यंकटेश्वरा नगरातील नागरीकांचा पुढाकार
यवतमाळ – मागील 6 महिन्यापुर्वी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने व्यंकटेश्वरा नगरामधील नालीचे बांधकाम नगर पालिका प्रशासनाने घरमालकांचे अतिक्रमण या कारणामुळे बंद करुन अर्धवटच नाली बांधून नागरीकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होईल अशी परिस्थिती परिसरात निर्माण करुन दिली. यासंदर्भात न.प. चे मुख्याधिकारी, न.प. चे अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रारी करुन सुध्दा अर्धवट नालीचे बांधकाम 6 महिन्यात देखील पुर्ण झालेले नाही. यासंदर्भात व्यंकटेश्वरा नगरातील असंख्य महिलांनी आज जिल्हाधिकारी अमोल येडगे, पालकमंत्री संजय राठोड, आ. मदन येरावार तसेच न.प. चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन अर्धवट नालीचे बांधकाम त्वरीत पुर्ण करण्याची मागणी रेटून धरली. याप्रसंगी व्यंकटेश्वरा नगरातील सौ. प्रिती बोरकर, अश्विनी अभ्यंकर, प्रीती फुलकर, रचना साखरे, मनिषा महल्ले, प्रेमिला गवई, मनिषा सुर्यवंशी, सुनिता फुलझेले, संबोधी साखरे सह असंख्य महिलांनी निवेदनावर स्वाक्षरी करुन अर्धवट नाली त्वरीत पुर्ण करण्याची मागणी केली आहे. मागणी पुर्ण न झाल्यास परिसरातील नागरीकांनी तिव्र आंदोलनाचा ईशाराही दिला आहे.
