Home यवतमाळ बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख पदी प्रविण लांजेकर

बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख पदी प्रविण लांजेकर

11

बाभुळगाव/प्रतिनिधी:-

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बाभुळगाव शहर प्रमुख पदी प्रविण पद्माकर लांजेकर यांची नेमणूक करण्यात आली.

शिवसेनेचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी ही नियुक्ती केली. यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रविण लांजेकर यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असुन बाभुळगाव शहरामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची बांधणी करणे, हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रीयपणे प्रचार व प्रसार करणे, शिवसैनिक नोंदणी, व इतर पदाधिका-यांच्या नियुक्या करणे, तसेच शहरातील जनतेच्या समस्या सोडण्याचे कार्य प्रविण लांजेकर यांना पार पाडावे लागेल. स्वच्छप्रतिमा असलेले प्रवीण लांजेकर यांची शहरात चांगली ओळख आहे. निवडीचे वेळी श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, हरिहर लिंगणवार, गजानन बेजंकीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, माधुरी अराठे, उपजिल्हाप्रमुख सचिन महल्ले, गोपाळ पाटील, रमेश अगरवाल आदि उपस्थित होते.

Copyright ©