Home यवतमाळ संतोष ढवळे यांच्या चालता फिरता जनता दरबाराणी अनेकांच्या समस्या मार्गी

संतोष ढवळे यांच्या चालता फिरता जनता दरबाराणी अनेकांच्या समस्या मार्गी

14

संतोष ढवळे यांच्या चालता फिरता जनता दरबाराणी अनेकांच्या समस्या मार्गी

शेकडो विद्यार्थी पालक ग्रामस्थ , दिव्यांग तथा शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी .

व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे दिवसागणित तासागणित
क मिनिटागणिक अगदी सेकंदाने बदलते. कारण बदल हा निसर्गाचा नियमच ..आज आपल्या हटके शैलीतून समाजाचं आपल्याला सुद्धा काहीतरी देनं असतं आणि ते देणं कसं असावं या संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यातील आनंद दिघे साहेब यांचा जणू वारसाच त्यांना गुरुस्थानी मानणारा वर्ग तथा सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून ख्याती प्राप्त यवतमाळ जिल्ह्यातील जनसेवक संतोष ढवळे (यवतमाळ जिल्हा शिवसेनाप्रमुख.)… सामान्य जनतेसाठी सदैव झटणारा जनसेवक अर्थातच संतोष… आज पहाटे ठरल्याप्रमाणे पहाटे सकाळी सातच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या दमतीसाठी स्वतः झोपेतून उठून तात्काळ यवतमाळ स्वतः गाडी चालवत बोरी येथे हजर झाले आणि बघता बघता त्यांचा चालता फिरता जनता दरबार बोरी येथील बस स्टॅन्ड चौकामध्ये सुरू झाला त्यांचा दरबार सुरू होताच विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा दृष्टीने एसटी महामंडळाचे डी एम हे तात्काळ हजर झाले. आणि विद्यार्थ्यांना होणारा अन्याय प्रवास करतानाचा त्रासअर्थातच गाड्यांचा थांबा ,जाणीवपूर्वक बस चालक थांबत
नसल्याने तथा विद्यार्थ्यांचे पासेस असल्याने त्यांना गाडीत सुद्धा घेत नव्हते. वारंवार सांगून सुद्धा कोणीही या प्रश्नाला मार्गी लावत नव्हता. तेव्हा याआधी शेगाव येथील दौऱ्या दरम्यान संतोष ढवळे यांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी स्वतः तात्काळ विद्यार्थ्यां भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांशी संपर्क करून प्रत्यक्ष त्यांची कान उघडनी केली. आणि आज ठरल्याप्रमाणे बोरी येथे अधिकाऱ्यांची बैठक लावली. त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणल्या आणि आज त्याचा ऑपरेशनच करून टाकले.. इथूनच त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सुद्धा संपर्क केला तसेच देवेंद्रजी फडणवीस सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क केला .. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांचे सुद्धा काने टोचली की विद्यार्थ्यांचा आपण शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं थांबा न दिल्यामुळे शिक्षणापासून वंचित ठेवत आहात ही बाब शिवसेना कदापि सहन करणार नाही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेत गाडीमध्ये जर विद्यार्थी पासित चालत नसेल तर त्या जागी दुसऱ्या गाड्या तात्काळ सुरू करा पालकांनी सुद्धा तक्रार करताना विद्यार्थी कुमारी राऊत तथा पालक रामेश्वर राऊत तसेच संजय बंद यांनी विद्यार्थ्यांना पाच सोबत पंधरा ते वीस रुपये द्यावे लागतात कारण काही बस पास घेत नसल्यामुळे त्यांना संध्याकाळचे ७ वाजता वाजता आणि बस कार्यावरून सुद्धा त्यामध्ये विद्यार्थ्यांना घेतल्या जात नसल्याचे तक्रार जिल्हा प्रमुखांकडे केली तसेच मानव विकास हिरकणी बसच्या संदर्भातही पालकांनी तक्रार यासंदर्भात डीएम चांदूरकर तसेच डीसी गोवारी यांच्याशी जिल्हाध्यक्षांनी दूर ध्वनीवर संपर्क साधून या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना केल्या. जर या संदर्भात कार्यालय झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल अशी उद्गा्गार सुद्धा त्यांनी काढले. याच दरम्यान बोरी येथील दिव्यांग मुलगी कुमारी वैष्णवी दिलीप गाडेकर या अंध मुलीच्या शिक्षण संदर्भात तिचे पालकत्व स्वीकारले. तसेच तिला वाद्याची आवड असल्याने हार्मोनियम बक्षीस म्हणून दिले.एवढेच नव्हे तर अडान नदी पुलाच्या बांधकामा संदर्भात विद्यार्थ्यांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागला. शेतकऱ्यांचे मोठे शेतीचे नुकसान झाले कारण त्यांना शेतीचे काम करण्याकरिता पुलावरून पाणी असल्यामुळे कोणतेच काम करता आले नाही. त्यामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. या संदर्भात तथा विद्यार्थी पालक, व्यापारी प्रवासी, शेतकरी, आदींचा विचार करून. तात्काळ पुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन चर्चा अंति मार्ग काढू असे सुद्धा ग्रामस्थांना सांगितले. त्याचप्रमाणे मुंडळ येथील वन विभागाअंतर्गत आवैद्य खोदकाम झाल्या प्रकरणीची तक्रार मुंडळ येथील समाजसेवक अवधूत गुघाने यांनी जिल्हाप्रमुखांकडे केली या संदर्भात तात्काळ कार्यवाइ झाली पाहिजे. अशी विचारणा दारव्हा येथील वनविभागाचे एचडीओ चव्हाण यांच्याकडे केली अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे आज सुमारे सकाळी सात ते दहा साडेदहा पर्यंत बोरी येथील बस स्टॅन्ड चौकामध्ये चालता फिरता जिल्हाप्रमुख शिवसेना संतोष ढवळे यांचा जनता दरबार भरून अनेक विद्यार्थी समस्याग्रस्त व्यक्ती ,व्यापारी, तथा ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन देत यानंतर सुद्धा माझा सर्कल मध्ये जनता दरबार आयोजित करून जनसामान्याचे रुग्णांचे प्रश्न मार्गी लावण्यास मी सदैव कटिबद्ध असल्याचे माहिती जिल्हाप्रमुखांनी दिली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच बोरी ग्रामपंचायत अंतर्गत अनेक लोकांनी घरकुला संबंधीच्या आम्हाला द्यावे घरकुल जाणीवपूर्वक न दिल्याचे तक्रार येथील नागरिकांनी केली.या प्रश्नाबाबत ग्रामसेवक ठक यांची सुद्धा चांगलीच कान उघडणी केली.. आणि स्वच्छते संदर्भात… काही निर्देश दिले. तसेच जनतेच्या सेवेसाठी मोठ्या आरोग्य शिबिराचे आयोजन सुद्धा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली… यावेळी शिवसेनेचे युवा सेनेचे, गिरजनन कळंबे ( शिवसेना उपजिल्हाप्रमुख), आशिष सावंकार, पुंडलिकराव भुरे (ठेकेदार), सुरेश तिजारे, ( ठेकेदार) , राजेश गुप्ता, ज्ञानेश्वर राऊत, बजरंग तायडे, निलेश आरू, बाळु मने, इस्रार शेख,, शेख अल्ताफ, वानखडे,रवी कदम, वैभव पुरी, पावडे,संजय बंन, अवधूत गुघाणे, निलेश अवचट, निखिलभाऊ, बालू नागपुरे, शंतणू राठोड, सुमित सोळंके, अनिकेत हिवरकर ,तथा ग्रामस्थ युवा सेना विद्यार्थी सेना पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Copyright ©