दत्त चौक येथे शिवसेनेचे निषेध आंदोलन
महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य विरोधात जनक्षोभ उसळला
(राज्यपाल कोश्यारी व भाजपा प्रवक्ता त्रिवेदी यांचा निषेध )
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केल्याने जनतेमधे सर्वत्र जनक्षोभ पसरला असून त्याचीच प्रचिती येथील दत्त चौकात दि .२१ नोव्हेंबर रोजी १२ वाजता शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतेच बोलताना छत्रपती शिवाजी महाराज त्या काळातले हिरो होते आजच्या काळातले हिरो डॉ .बाबासाहेब आंबेडकर व नितीन गडकरी आहेत असे तुलनात्मक वादग्रस्त विधान करून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे व नुकतेच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबला पाच वेळा पत्र पाठवून माफी मागितली होती असे बेताल वक्तव्य करून महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे येथील संतप्त शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिकांनी,शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला .या वेळी
शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला या वेळी राजेंद्र गायकवाड (जिल्हा संपर्कप्रमुख) संतोष ढवळे ( जिल्हाप्रमुख) तालुका प्रमुख संजय रंगे,सुजित मुनगिनवार (उपजिल्हाप्रमुख व्यापारी आघाडी,)अतुल गुल्हाणे (शहर प्रमुख) चेतन शिरसाट (उपशहरप्रमुख) युवा सेना शहर प्रमुख: कुणाल राडे युवासेना तालुका प्रमुख पवन शेंद्रे
शिवसेना शहर संघटक तुषार देशमुख
महिला संघटिका- कल्पनाताई दरवई ,निर्मलाताई विनकरे सागर ताई पुरी मंदाताई गाडेकर लताताई चंदेल पुष्पाताई जयस्वाल संगीता ताई गिरी अशोक पुरी व समस्त पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिक उपस्थित होते
