तालुका प्रतिनीधी/घाटंजी
अमोल नडपेलवार
घाटंजी नगर परिषद मार्फत बचत गटांणा लाखो रूपयाचे रोजगारासाठी कर्ज वाटप
स्वयंरोजगारातुन महीलांणी प्रगतीची वाटचाल करावी मुख्यअधिकारी अमोल माळकर यांचे आव्हाण
घाटंजी:दिनांक.17 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषद घाटंजी अंतर्गत विघ्णहर्ता महिला बचत गट , जय माता दी महिला बचत गट व जगदंबा महिला बचत गट या तीन बचत गटांना अनुक्रमे 5,00,000/- रु. व 2,50,000/- रु व 2,75,000/- रु.असे अनुक्रमे 10,25000/-रु. मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल माळकर यांच्या उपस्थितीत कर्ज वितरण करण्यात आले आहे. सदर कर्ज रकमेतून महिलांना लघु उद्योग गृह उद्योग, उभे करून महिला सक्षमीकरण करण्याबाबत माळकर सरांनी मार्गदर्शन केले. चालू आर्थिक वर्षांत अभियान अंतर्गत नगर परिषद घाटंजी मार्फत बचत गटांना 85,00,000/- लक्ष रु. कर्ज वाटप करण्यात आले व 21 बचत गटांना 2,10000/- रु फिरता निधी देण्यात आला आहे. गरजू पात्र बचत गटांना लघु उद्योग उभारणी करिता ई – रिक्षा व फिरते चारचाकी भाजीपाला विक्री गाडी ,90% सबसिडी वर वितरित करण्यात आली. सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. किशोर अंबुरे यांनी PM Svanidhi योजनेची माहिती दिली. PM Svanidhi योजने अंतर्गत रु. 29 लक्ष, 50 हजार वितरित केले. दिव्यांग कल्याण योजने अंतर्गत एकूण 239 दिव्यांग लाभार्थीना रु. 24 लक्ष 61 हजार, 684/- रुपये नगर परिषद घाटंजी अर्थ संकल्पाच्या दिव्यांगासाठी राखीव 5% निधीचे वितरण करण्यात आले. व तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, उज्ज्वला योजना, PM मातृवंदना योजने विषयी बचत गटांना अभियान प्रकल्पा अंतर्गत फेरीवाले, व्यावसायिक महिला व पुरुषांना PM Svanidhi व PMFME योजने संदर्भात जास्तीतजास्त लाभार्थ्यानी योजनेचा लाभ घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन सहा.प्रकल्प अधिकारी यांनी केले. तसेच NULM समन्वयक सदानंद आडे यांनी बचत गटाचे कर्ज व्यवस्थित परतफेड करून आपल्या बचत गटाची गुणवत्ता व्यवस्थित टिकविने व बचत गटाला पुढील कर्ज घेणे सुकर व्हावे. याकरिता बचत गटाचा व्यवहार व्यवस्थित करणेबाबत मार्गदर्शन केले. तसेच वरील सर्व बचत गटांना कर्ज मिळण्याकरिता बचत गटाचे प्रस्ताव फाईल तयार करणे करिता सहयोगिनी सोनाली भोयर, CRP सोनाली भोयर व CRP सोनाली भद्रे यांनी परिश्रम घेतले. घाटंजी नगर परिषद तर्फे जास्तीतजास्त पात्र लाभार्थ्यानी शासकीय योजनेचा लाभ जसे की, शेतकरी बचत गटांना वेअर हाऊस साठी रु. 1 कोटी 60% सबसिडी, PM स्वनिधि योजने अंतर्गत तीन टप्यात विनातारण कर्ज वाटप, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME ) अंतर्गत वैयक्तिक, स्त्रि- पुरुष बचत गट, दिव्यांग बचत गट, शेतकरी बचत गट यांना प्रकल्पाच्या 35% पर्यंत सबसिडी असेल, व तसेच दिव्यांग लाभार्थी ज्यांचे ऑनलाईन प्रमाणपत्र नसेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर व प्रकल्प अधिकारी किशोर अंबुरे यांनी केले. दिव्यांग नोंदणी, फेरीवाला धोरण,पथ विक्रेते, बचत गट, स्थापन, व्यवसाय प्रकल्प प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी NULM व दिव्यांग कल्याण कक्ष नगर परिषद घाटंजी कार्यालयात संपर्क साधाण्याचे आव्हाणही केले.
