Home यवतमाळ जेथे भगवंत सर्व बंधन गळतात माया आली तर पाश आवळतात – स्वामी...

जेथे भगवंत सर्व बंधन गळतात माया आली तर पाश आवळतात – स्वामी चिदंबरानंद

14

जेथे भगवंत सर्व बंधन गळतात माया आली तर पाश आवळतात – स्वामी चिदंबरानंद

यवतमाळ – भगवंत आल्यावर सर्व बंधन गळून पडतात, पण माया आली तर सर्व पाश आवळल्या जातात. पुन्हा बंधन होते. हा मार्मिक मुद्दा अनंद श्री विभुषीत स्वामी चिदंबरानंद यांनी आज सांगितला. कुणाला सुखरुप गोकुळाला पोहचवून नंदबाळाची कन्या घेवून मधुरेच्या कारागृहात परतल्यावर घडला. देवकीच्या गर्भातून कृष्ण जन्म होताच कारागृहाची दारं उघडली, सर्व पहारेकरी झोपले, हातबेड्या गळून पडल्या, बंधमुक्त होऊून वसुदेव गोकुळला पोहचले. आपला बाळ यमुना पार करुन गोकुळला यशोदाजवळ ठेऊन त्याची कन्येस घेऊन आला. मायेस येताक्षणीच फाटकं लागले, कुलूप लागली, पुन्हा वसुदेव बेड्यात जखडले गेले.
कंसास 8 वे अपत्य झाल्याचे कळताच कंसाने ती कन्या देवकी जवळून हिसकून दगडावर आपटली, ती जगदंबेच्या मशमायेच्या रुपात प्रकट होईल कंशाला सांगून, की तु ज्याला मारणार आहे तो सुरक्षीत पोहचला आहे, अंतर्ध्यान झाली. ईश्वराच्या अनुग्रहासाठी माणसानं उदार मनाचा व्हावे, मोठे व्हावे. गोकुळचे नंद बाबा उदार व दानवीर होते. त्यांनी बाळकृष्ण व बलरामवर चुडाकर्म संस्कारावर आलेल्या ब्राम्हनांनो घरातील सर्व आभुषण संचित वाटून टाकले, घरात आल्यावर पाहिले तर ते धन पूर्ववत तसेच होते, जेवढ्या वेळा चांदी-सोने, हिरे जवाहिर वाटत गेले. तरी संपत नव्हते, याचे कारण दानवीर नंदबाबाच्या प्रतिष्ठेत धक्का लागू नये याची काळजी स्वत: लक्ष्मीने घेतली होती.
आज स्वामीजींनी श्रीकृष्ण बलरामाची बाललीला व गोवर्धन पूजा, इंद्राचे गर्वहरण प्रसंग सांगितले. भगवंताच्या बाललीला सर्वांनाच आवडतात, भगवंत वारंवार पृथ्वीवर लीला अवतार घेतात ते भक्तांसाठी घेतात.
रावण, कंस, हिरण्यकश्यप, हिरण्यास आदींचा वध, किंवा आसुरी संस्थेचा सर्वनाश तर वैठुंठातूनच नारायणास शक्य असताना, ते अवतार घेता ते केवळ भक्तासाठींच घेत असतात.
संस्कारासाठी आग्रह करतांना स्वामीजी म्हणाले की, कोणी आपले देवी-देवता, आपले ग्रंथ, आपले आदर्श यांचे अज्ञानता वश आलोचना करतात, त्यांचा प्रतिकार हि करण्याचे आवाहन केले.

Copyright ©