Home यवतमाळ प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे, हा शेतकऱ्यांचा विजय- अभिषेक ठाकरे

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे, हा शेतकऱ्यांचा विजय- अभिषेक ठाकरे

9

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे, हा शेतकऱ्यांचा विजय- अभिषेक ठाकरे

घाटंजी: तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, मात्र तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या द्वेषपुर्ण भावनेमुळे तालुक्यातील हजारों शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या रकमेच्या 55 टक्के कुठे 52 टक्के असा निधी वाटप करण्यात आला आहे.त्या बाबत दि.1/11/2022 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्री.अभिषेक ठाकरे, व य.जि.म.सहकारी बँक चे संचालक श्री.आशिष लोणकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यानी अतिवृष्टी अनुदान वाटपात झालेली चूक दुरुस्त करण्या करिता तहसीलदारांना निवेदन दिले होते.परंतु त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने दि.10/11/2022 रोजी अभिषेक ठाकरे ,आशिष लोणकर यांचे सह सुरेश नाईक ,मधुकर डंभारे ,गुणवंत लेनगुरे,देवराव वाडगुरे,वसंता जाधव ई.. शेतकरी आमरण उपोषणाला बसले होते. त्यातिल मागण्या म्हणजे जुन ते आँगस्ट दरम्यान झालेल्या अतिरुष्टी मुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना 13600/रूपये अनुदान देण्यात यावे, सप्टेंबर व आँक्टोंबर मध्ये परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे 100 टक्के अनुदान देण्यात यावे, सदोष अहवाल सादर करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, तालुका प्रशासनाचा सदोष अहवाल दुरूस्त करून पिक विमा कंपनी व वरिष्ठ कार्यालयाला कळवून तालुक्यातील शेतकऱ्यांना 100 टक्के पिक विमा देण्यात यावा. या आंदोलना दरम्यान तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा मिळणारा ऊस्फर्त प्रतिसाद तसेच तालुक्यांतील सर्व स्तरातील नागरिकांचा मिळणाऱ्या पाठिंबा मुळे अभुतपूर्व यश मिळाले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालया समोर हजारो शेतकरी उपस्थित होते.त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता बघता जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत उपोषण सोडण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली, व उपोषण कर्त्यांच्या मागण्या आहेत त्या तात्काळ मार्गी लावत असल्याचे लेखी आश्वासन दिले. जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी सोनाली माडकर, नायब तहसीलदार दिलिप राठोड, यांनी उपोषण कर्त्यांना निंबु सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या करितागावी पत्रकार बंधुनी विशेष प्रयत्न केले. या विजया चे वेळेस श्री.अभिषेक ठाकरे, ,श्री.आशिष लोणकर , जितेंद्र मोघे, बल्लू पाटील लोणकर, डॉ.अरविंद भुरे ,रुपेश कल्यमवार, मोरेश्वर वातीले ,संजय गोडे,यादवराव निकम,नामदेवराव आडे ,अकबर तव्वर, आशिष भोयर ,सुभाष गोडे,महेश ठाकरे, थावरसिग चव्हाण,निखिल देठे, डॉ तव्वर,सह अनेक शेकडो शेतकरी उपस्थित होते…

Copyright ©