Home यवतमाळ निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे अन्यथा आर्णी तहसीलवर...

निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे अन्यथा आर्णी तहसीलवर मोर्चा.

12

सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान

निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे अन्यथा आर्णी तहसीलवर मोर्चा.

मुबारक तंवर यांचा इशारा.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना यावेळची दिवाळी अनुदानाविनाच साजरी करावी लागल्याने या दोन्ही योजनेतील वंचित लाभार्थ्यांना पंधरा दिवसाच्या आत अनुदान मिळाले नाही तर पंधरा दिवसानंतर आर्णी तहसील कार्यालयावर मोर्चा काढू असे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर यांनी सोमवार दिनांक 31 आक्टोंबर रोजी तहसील कार्यालयात संबंधितांना प्रत्यक्ष भेटून इशारा दिला.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे बारा हजार पाचशे लाभार्थी असून यापैकी किमान 700 लाभार्थ्यांचे दिवाळी सणाच्या शुभपर्वावर अनुदान थांबविण्यात आले, संजय गांधी निराधार योजनेत विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत,अपंग, तृतीयपंथी, सिकलसेल व एचआयव्ही पीडित लाभार्थी आहेत तर श्रावणबाळ योजनेत वयोवृद्ध भूमिहीन नागरिकांचा समावेश आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान शेती व मुले मोठी झाली इत्यादी कारणे दाखवून अनुदान थांबविण्यात आले तर काहींचे अनुदान बंदच करण्यात आल्याचे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
या दोन्हीही योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान थांबून शासन एकप्रकारे जाणून बुजून अडवणूक करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर यांनी केला आहे.
ज्या ज्या लाभार्थ्यांचे अनुदान थांबविण्यात आले अथवा बंद करण्यात आले ते पंधरा दिवसाच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा करावे अन्यथा पंधरा दिवसानंतर आर्णी तहसील कार्यालयावर अपंग, विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, वृद्ध यांचेसह मोर्चा काढू असे मुबारक तंवर यांनी यावेळी सांगितले.

Copyright ©