कराटे प्रशिक्षक यवतमाळ चे सेन्साई रोहित केवारकर व सेंम्पाई अश्विनी उईके राष्ट्रीय पंच परीक्षा उतिर्न
आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त भारतातील एकमेव कराटे संघटना कराटे इंडिया ऑर्गनायजेशन मान्यतेने दि.१६ ऑक्टोबर २०२२ रोजी न्यु.आर्ट कॉलेज, बॅचलर रोड वर्धा येथे राष्ट्रीय कराटे पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते . वर्धा येथे आयोजित राष्ट्रीय कराटे पंच परीक्षेत विदर्भातील कराटे प्रशिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या परीक्षेला सुमारे ५० पेक्षा अधिक मान्यताप्राप्त कराटे प्रशिक्षक सहभागी झाले होते. कराटे खेळाच्या नियमावलीतील झालेल्या बदलानुसार नवीन नियमांबाबत मार्गदर्शन करण्याकरीता कराटे खेळाची आंतरराष्ट्रीय संघटना ‘वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF)’ च्या मान्यताप्राप्त पंचांच्या देखरेखीखाली सिहान अनुप देठे व कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव सिहान संदीप गाडे, खजिनदार सिहान संदीप वाघचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंच परीक्षा घेण्यात आली. या पंच परीक्षेत यवतमाळ जिल्ह्याचे कराटे प्रशिक्षक सेन्साई रोहित राजेश केवारकर व सेंम्पाई अश्विनी गणेश उईके यांनी पंच परीक्षा पास करून यवतमाळ जिल्ह्याचे नाव राज्यात व भारतात कमावले. या परीक्षेत विदर्भातील (११जिल्ह्यातील) मान्यताप्राप्त कराटे प्रशिक्षकांनी हाजिरी लावली
तसेच वर्ल्ड कराटे फेडरेशनचे पंच अनुप देठे यांचे पीपीटी द्वारे व मॅटवरील प्रत्यक्ष पंचाची कार्ये या विषयावर सखोल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
सेन्साई रोहित केवारकर व सेंमपाई अश्विनी उईके यांच्या या यशस्वीते बदल जिल्ह्यातील सर्व कराटे प्रशिक्षक तसेच कराटे एसोसिएशन यवतमाळचे सचिव विनोद खोडकुंबे खजिनदार हेमंत उईके, अजित मिश्रा, सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीण पत्रकार संघ) प्रवीण दिघाड़े, रविन्द्र महानुर, व मनोज गुजरे यांनी अभिनंदन केले.
