Home यवतमाळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एक गंभीर जखमी

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एक गंभीर जखमी

12

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एक गंभीर जखमी

तुपटाकळी ते बेलोरा रस्त्यावरील अपघात

दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी ते बेलोरा रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.१३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे की, संतोष मारुती काळे (अं वय ५०) वर्ष रा. दहेली इचोरा ता आर्णी असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. आर्णी येथून पाहुणा म्हणून दिग्रस तालुक्यातील साखरी येथे मुक्कामी राहून सकाळी तो बेलोरा येथील पाहुण्यांची भेट घेण्यासाठी तुपटाकळी मार्गे बेलोरा जात होते. अशातच आज दि.१३ ऑक्टोबर च्या सकाळी ९:३० वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडून होते. ही बाब तेथील नागरिकांना माहीती होताच पोलिसांना माहिती दिली तेव्हा जखमीला आणण्यासाठी रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाठविले तेव्हा जखमींची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्याला शासकीय रुग्णालयात यवमाळ येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून.अज्ञात वाहनाचा पोलिस तपास घेत

Copyright ©