Home यवतमाळ बेघर मोकाट कुत्र्यांच्या पिल्ल्यांसाठी दत्तक शिबिर स्तुत्य उपक्रम यवतमाळात पहिल्यांदाच.

बेघर मोकाट कुत्र्यांच्या पिल्ल्यांसाठी दत्तक शिबिर स्तुत्य उपक्रम यवतमाळात पहिल्यांदाच.

13

बेघर मोकाट कुत्र्यांच्या पिल्ल्यांसाठी दत्तक शिबिर स्तुत्य उपक्रम यवतमाळात पहिल्यांदाच.

यवतमाळ – ओलावा पशु प्रेमी संस्था यवतमाळच्या वतीने मोकाट कुत्र्यांच्या पिल्यांसाठी दत्तक विधान शिबीर नगर परिषद शाळा क्रमांक 19 समर्थवाडी यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मोकाट कुत्र्यांना जे पिल्लं होतात ते रस्त्यावर गाडी खाली येऊन दगवता तर काही आजाराने मरण पावत अशा सर्व मोकाट कुत्र्यांचा पिल्लांना एका जागेवर आणून त्यांना पूर्णपणे लसीकरण करून व त्यांना डॉक्टर कडून पूर्णपणे तपासणी करून एका जागी जमा करण्यात आले होते.या शिबिराचा उद्दीष्ट एवढंच होते की मोकाट कुत्र्याच्या पिल्लांना आश्रय मिळावा व त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे व्हावे.या शिबीराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकुण 20 पिल्ले या शिबीरात होते. त्यापैकी 16 पिल्यांना नागरिकांनी दत्तक घेतले.भविष्यात या श्वाना पासून कुणाही इजा अथवा बेवारस श्वाना पासून भीती राहणार नाहि या अनुषंगाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले या .या शिबिराला न.प. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी भेट देऊन या शिबिराचे व आयोजकांचे कौतुक केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पवन दाभेकर, ऋषिकेश भोंग, चेतन बोरकर, निलेश पेंडले, सुमेध कापसे, मयंक अहिर, भुषण घोडके, श्वेता चंदनखेडे, पियुष मुळे, आशय नंदनवार, कार्तिक चौधरी, डॉ. अलोक गुप्ता, दीपक बागळी यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©