Home यवतमाळ 7 फूट लांबीच्या अजगराला जीवदान कृतीतून साजरा होत आहे वन्यजीव सप्ताह

7 फूट लांबीच्या अजगराला जीवदान कृतीतून साजरा होत आहे वन्यजीव सप्ताह

13

7 फूट लांबीच्या अजगराला जीवदान
कृतीतून साजरा होत आहे वन्यजीव सप्ताह

हिवरी / वन्यजीव सप्ताहाला सुरुवात होऊन 4 दिवस झाली आहे. त्यामध्ये वनविभाग प्रत्येक दिवशी पर्यावरण विषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून लोकांन मध्ये पर्यावरनाविषयी जागरूकता निर्माण करत आहेत.

त्याचबरोबर हिवरी मनदेव परिसरातील MH29 HELPING HAND टीमचे सर्पमित्र आणि वन्यजीव रक्षक यांनी या वन्यजीव सप्ताहामध्ये चार दिवसात सात सापांना वनविभागाच्या मदतीने जीवदान दिले आहे.

आज सकाळी वनविभाग आणि सर्पमित्र टीम ने 7 फूट लांबीचा व 20 ते 25 किलो वजन असलेल्या अजगराला सुरक्षित रेस्क्यू करून त्याला त्याच्या नसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यामध्ये वनविभागाचे मनपूर राऊंड ऑफिसर ,वनपाल श्री. सुनील लोहकरे, अर्जुना बिट वनरक्षक विवेक पांडे, मनपूर वनरक्षक प्रांजली दांडगे आणि MH29 हेलपिंग हँड टीम चे जीवन तडसे ,दीपक मिराशे उपस्थित होते.

Copyright ©