महानुभाव पंथीय श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा रौप्य महोत्सव दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन
श्रीकृष्ण ज्ञान मंदिराच्या रौप्य महोत्सव दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आज झालेल्या विशेष बैठकीत प पू प म, रेवेराज बाबा दिल्ली यांनी श्री कृष्ण ज्ञान मंदिर बोरुंदिया नगर यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
२७,२८ डिसेंबर २०२२ ला दोन दिवशीय महानुभाव पंथीय भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या वेळी प्रथम पचावतार महोत्सवास, दू. २ वाजता भव्य शोभायात्रा, अन्नदान,भजन संध्या,२८ सन्यास दीक्षा विधी,ज्ञान सत्र, दोन दिवसीय कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमास नामवंत हजारो संत महंतांची उपस्थिती राहणार असल्याचे हि सांगण्यात आले,या वेळी
कुलभूषण,आचार्य प्रवर प.पू प. म.श्री लाडबाबा हरसुल , प पू प. म श्री रेवेराजबाबा शास्त्री दिल्ली ,श्रीकृष्ण ज्ञान मंदिर यवतमाळ, प पू. प. म.विजयराजबाबा पंजाबी प पू प. म धनंजयबाबा पंजाबी, प पू.दर्पण मुनी अंकुळणेरकर,यांच्या प्रमुख उपस्थितीत महानुभाव पंथीय सद्भक्त प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी
सुशील अंबाडकर,हेमंत पिसे, चारूदत्त जावरकर, रावजी डोळे,नरेश उद्वंत ,मोहनराव साठवणे, रावजी डोळे,रमेश सांबारे,डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे,गणपतराव डोळे,चंद्रकांत वानखेडे,मुरलीधर राव लकदिवे, किसनराव बोपटे,रमेश आम्ले,रमेश झामरे अरविंद मोरे, धनराज झामरे,शुभम लाड,संजय सांबारे, राजु घुगरे,प्रकाश लोखंडे , व अनेक महिलांचा समावेश होता.
