Home यवतमाळ सहा दिवसात १२ गावे लस मुक्त, डॉ.गोपाल चव्हाण यांनी २४ तास सेवा...

सहा दिवसात १२ गावे लस मुक्त, डॉ.गोपाल चव्हाण यांनी २४ तास सेवा देऊन पूर्ण केले लसीकरण

12

सहा दिवसात १२ गावे लस मुक्त,
डॉ.गोपाल चव्हाण यांनी २४ तास सेवा देऊन पूर्ण केले लसीकरण

कोरोना सारखी अतिशय भयानक बिमारी आता जनावरांवर येऊन ठेपली आहे. लम्पी स्कीन डीसीज हा चर्मरोग भारतात सर्वत्र पसरलेला आहे. राजस्थान, गुजरात नंतर महाराष्ट्रात प्रवेश करून पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे. लम्पी स्कीन डीसीज हा रोग त्वचारोग असून सांसर्गजन्य आहे. ह्या रोगाने न घाबरता योग्य वेळी पशु वैदयकीय अधिका-यांना किंवा जवळच्या पशुवैदयकीय दवाखान्याला माहिती दिल्याने आटोक्यात आणता येते.
पशुवैदयकीय दवाखाना हिवरी अंतर्गत १२ गावे येतात. डॉ. गोपाल उल्हास चव्हाण, पशुधन विकास अधिकारी, हिवरी यांनी मागील ५-६ दिवसांमध्ये सर्वत्र १२ ही गावांमध्ये लसीकरण करून लस मुक्त केले आहे . हिवरी दवाखान्या अंतर्गत सध्या लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना योग्य तो उपचार दिलेला आहे व आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांची संख्या नगण्य आहे. डॉ. गोपाल चव्हाण, पशुधन विकास अधिकारी व त्याचा सोबत निकम, पट्टीबांधक, रुद्रा खैरे, श्रीराम चव्हाण, अंश गटलेवार, वैभव ठाकरे व महेश कुंभेकर आदी. पशुधन पर्यवेक्षक यांनी विशेष मेहनत घेऊन जवळपास ३००० च्या पेक्षा जास्त जनावरांवर लम्पी रोगावरील लसीकरण केले आहे.
लम्पी सदृश्य आजार जनावरांमध्ये आढळून आल्यास पशुवैदयकीय दवाखाना हिवरी येथे किंवा डॉ. गोपाल चव्हाण यांना वैयक्तीक फोन करून कळवणे असे अव्हान डॉ. गोपाल करून पशुधन विकास अधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले.

Copyright ©