Home यवतमाळ यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलवर धडक मोर्चा

यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलवर धडक मोर्चा

13

यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलवर धडक मोर्चा

यवतमाळ तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर, बेरोजगार युवक हे केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने त्रस्त झालेले आहे.तसेच शासनाच्या घरकुल योजनेमधील ज्याच्यासाठी जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी, पेट्रोल, डिझेल,गॅस सिलेंडरची दरवाढ झालेली असताना तसेच महागाईचा उच्चांक गाठलेले असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार व केंद्रातील भाजपचे सरकार झोपी गेलेले आहे.वरील बाबींचा निषेध करण्यासाठी यवतमाळ तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकरी बेरोजगार मजूरदार, शहरवासी यांनी बैलबंडी ट्रॅक्टर घेऊन खालील मागण्यांचे निवेदन देण्याकरता आज तहसील कार्यालयावर धडकून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.या मोर्चाच्या प्रमुख मागण्या 1)यवतमाळ तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा 2)वाढलेली महागाई त्वरित कमी करण्यात यावी 3)बेरोजगार युवकांना रोजगार त्वरित देण्यात यावा 4)अतिवृष्टी व पुराने खसलेल्या विहिरी शासकीय निधीतून बांधून देण्यात यावा 5)नगरपरिषद यवतमाळ येथील कर्तव्यदक्ष आदिवासी मुख्याधिकारी यांची बदली करण्यात येऊ नये.6) शेततळे विहिरींना कृषी पंपासाठी वीज जुनी तात्काळ देण्यात यावी 7)शेतकऱ्यांना पिक विमा त्वरित मिळण्यात यावा ही 8)पीक पाणी अहवाल तलाठी यांनी करावा9) 2014 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे कर्जमाफी केली अशा पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी 10)प्रधानमंत्री किसान योजनेची जबाबदारी फिक्स करा या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याकरिता धडक मोर्चा श्री.बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला त्यावेळी यवतमाळ तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते, व प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थिती होते.

Copyright ©