मला न्याय द्या हो न्याय,मला न्याय मिळेल का?
सूमित्राची प्रशासनाला आर्त हाक!
कॅबिनेट मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली,
अन्याय ग्रस्त पीडित महिला भोगताहेत मरणयातना,
जिल्हा अधिकाऱ्याचे आश्वासन,हे आश्वासनच राहिले,
विस्तार अधिकारी आले अन त्या अन्यायग्रस्त महिलेची खिल्ली उडऊन गेले
वाई रुई येथील अमृत महोत्सवी ध्वजा रोहणाचे वेळी निराधार महिलेने ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला या वेळी अन्न पुरवठा मंत्री संजय राठोड यांनी अन्याय ग्रस्त महिला सुमित्रा बनसोड हिच्या समस्या ऐकुन घेतल्या सन.२००२ पासून सूमित्राचे नाव घरकुल यादी मध्ये आहे सन २०१२ मध्ये तिचे नाव यादीत आले तिच्या नावाचे घर दुसऱ्या कडून पैसे घेऊन त्याला देण्यात आले, या बाबत सुमित्रा नी घर मागितले असता तुझा कडे संडास नाही तू अगोदर संडास बांध नंतर तुला घर देतो ,सुमित्रा ने कर्ज घेतले, महीला बचत गटा करूनही कर्ज घेतले व अंगावरील दागिने विकून अखेर संडास बांधला मात्र ग्रामसेवकांनी पुन्हा पलटी मारली आता वेळ गेली पुढे पाहू अशा प्रकारचा छळ करण्यात येत असल्याचे सांगितले,यातच संतत धार पावसाने तिचे घर ही पडले , हीच्यावरील अन्यायाच्या चौकशी करीता जिल्हा अधिकारी,मुख्याधिकारी याना चौकशी करून ग्रामसेवक याला निलंबित करण्याचे तोंडी आदेश दिले तर दोषींवर कारवाई करण्यात येईल सुमित्रा वर झालेल्या संपूर्ण अन्यायाची चौकशी सात दिवसात करण्यात येईल असे आश्वासन या वेळी देण्यात आले,त्या नंतर विस्तार अधिकारी,महिला अधिकारी, व ग्रामपंचायत पदाधिकारी तथा ग्रामसेवक,सुमित्रा यांच्या घरी आले तिला सदस्यांनी दमदाटी केली तर विस्तार अधिकारी यांनी तुला घरकुल पाहिजे का?असा उध्दट प्रश्न केला तर ग्रामसेवक यांनी तिला असशील शिवीगाळ केली होती,हा प्रश्न ग्रामसेवक यांना केला असता ग्रामसेवक म्हणाले की मी गंमत केली असल्याचे सांगितले या करून सुमित्रा पुन्हा भडकली गंमत करायला मी काय तुझी मेहुणी लागतो काय? या करून तर सदस्यांनी हि अधिकाऱ्यास समक्ष सुमित्राचा चांगलाच क्लास घेतल्याचे सुमित्रानी प्रतिनिधिशी बोलताना सांगितले आता मला न्याय कोण देणार! असा प्रस्न सुमित्रा करीत आहे.आता न्याय माघावा तर कुणाला,आणि कसा,मारायला जावं तर मरू देत नाही,जगावं तर हे लोकं जगू देत नाही आता मला न्याय द्या असा टाहो सुमित्रा फोडताहेत,मला न्याय द्याही न्याय!
