24 ऑगस्ट पासून श्वेतांबर जैन धर्मियांचे पर्युषण पर्व प्रारंभ : भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
यवतमाळ – वर्षावास निमित्त राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म.सा. यांचे सुशिष्य रत्न श्रमण संघीय उपप्रवर्तक खांदेश शिरोमणी परमपुज्य गुरुदेव श्री अक्षय ऋषीजी म.सा. आदि ठाणा तीन च्या उपस्थितीमध्ये श्वेतांबर जैन धर्मियांचे पर्युषण पर्व 24 ऑगस्टपासून प्रारंभ होत असून 31 ऑगस्ट पर्यंत हे पर्युषण पर्व महोत्सव सुरु राहणार आहे. सकाळी 6.15 ते 7.00 प्रार्थना, 8.30 ते 9.15 अंतगड सुत्र वाचन, 9.15 ते 10 अक्षय अमृत प्रवचन, दुपारी 2.30 ते 3.15 कल्पसुत्र वाचन 3.15 ते 4.00 विभीन्न धार्मिक स्पर्धा तसेच रात्री 8.15 ते 9.15 युवा संवादचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुर्यास्तानंतर देवशी प्रतिक्रमणाचे आयोजन नियमितपणे करण्यात आले आहे. 24 ऑगस्ट रोजी तेला अठाई तप आराधना, तसेच पाप का नाश परमात्मा का विकास या विषयावर प्रवचन तर 25 ऑगस्ट रोजी सामायीक बेला, कषाय का शमन वितरागता का वरण, या विषयावर प्रवचन, 26 ऑगस्ट रोजी 321 एकासन हृदय पारदर्शक प्रभू मार्गदर्शक तर 27 ऑगस्ट रोजी पोरसी दिवस स्व. निरीक्षण सिध्दत्वका परिक्षण या विषयावर प्रवचन तर 28 ऑगस्ट रोजी 321 दया दिवस दुख से देवता या विषयावर प्रवचन तर 29 ऑगस्ट रोजी ब्यासना दिवस अनुकंपा से अरिहंत करुणा भावना या विषयावर प्रवचन तर 30 ऑगस्ट रोजी सामायीक तेला सत्वेषु मैत्री मैत्री भावना या विषयावर प्रवचन, तर 31 ऑगस्ट रोजी 521 उपवास व सामुहिक क्षमा विरस्य भूषणम् तर 1 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता सामुहिक क्षमापणा कार्यक्रमाचे आयोजनासह नियमितपणे दुपारी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सकल जैन बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, महामंत्री शाम भंसाली व चातुर्मास समितीचे अध्यक्ष अमरचंद गुगलिया यांनी केले आहे.
