Home महाराष्ट्र भारुडकार कै. रुस्तुमराव मास्तर काळे यांच्या स्मरणार्थ पैठण राज्य स्तरीय भारुड स्पर्धा

भारुडकार कै. रुस्तुमराव मास्तर काळे यांच्या स्मरणार्थ पैठण राज्य स्तरीय भारुड स्पर्धा

9

पैठण/प्रतिनिधी

भारुडकार कै. रुस्तुमराव मास्तर काळे यांच्या स्मरणार्थ पैठण राज्य स्तरीय भारुड स्पर्धा

मराठवाड्यातील सुप्रसिध्द भारुडकार वै. रुस्तुमराव मास्तर काळे ( कोठीवाले ) यांच्या स्मरणार्थ राज्य स्तरीय शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज रचित भारुड स्पर्धा दि. २१ व २२ आगष्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या भारुडकारांना विविध पारितोषिक ठेवण्यात आली असल्याची माहीती संयोजक अरुण पा. काळे यांनी दिली आहे.
प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये व स्मृतीचिन्ह ( विलास बापु भुमरे – सामाजिक प्रतिष्ठान यांचे तर्फे) ,द्वितीय पारितोषिक ७ हजार रु. स्मृतीचिन्ह (काळे परिवार श्रीक्षेत्र वडवाळी ता . पैठण) यांचे तर्फे, तृतिय पारितोषिक ५ हजार रु. स्मृतिचिन्ह (नंदु पा . पठाडे माजी सभापती पंचायत समिती यांचेतर्फे), चतुर्थ पारितोषिक ३ हजार रु. .3000 / आर. व्ही. चव्हाण पैठण यांचे तर्फे
स्पर्धेत इतर वैयक्तीक पारितोषिके ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचे नियम व अटी भारुड संघात जास्तीत जास्त ( ७ ) कलाकारांचा समावेश असावा . भारुड संघातील कलाकारांनी भारुडासाठी लागणारे सर्व साहित्य वेषभुषा , मृदंग , टाळ , पेटी , विना , चिपळ्या , घुंगरु व इतर साहित्य स्वतःचे आणावे लागेल. एका संघात भाग घेतलेल्या कलाकार / वादन काम करणारास दुसऱ्या संघात भाग घेता येणार नाही . प्रत्येक संघास फक्त 20 मिनीटाचा वेळ मिळेल. प्रवेश फी एका संघास १०० / – रुपये, नोंदणी करतांना व शेवटची तारीख पाठवणे . दि . १८ ऑगस्ट गुरुवार सांय. ५ वाजता स्विकारली जाईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या कलाकार / कलावंतांची निवास , भोजन , चहा , नाश्ता व्यवस्था संयोजकाकडून मोफत केली जाईल . तसेच महिला कलावंताची निवास व्यवस्था स्वतंत्र केली जाईल. स्पर्धेचे उदघाटन दि. २१ आगष्ट रोजी रविवारी दुपारी बारा वाजता होईल. तर समारोप सोमवार दि. २२ आगष्ट रोजी दुपारी. दोन वाजता संपन्न होईल . स्पर्धा – शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज समाधी मंदिर समोरील डोम मंडप सभागृह पैठण येथे संपन्न होईल. प्रवेश नोंदणीसाठी अरुण रुस्तुमराव काळे संपर्क – मो.नं. 9822099601, 7820940819, उत्तम सोनाजी साबळे – 9420813261, रविंद्र भरतराव काळे- 9764312275 यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धा संयोजक संत एकनाथ महाराज मंदिर विश्वस्त मंडळ, श्रीलक्ष्मी बालाजी सामाजिक प्रतिष्ठान वडवाळी, नागरी सह पतसंस्था विलास बापु भुमरे, नंदलाल काळे , दादा बारे,अरुण काळे , डॉ.पंडित किल्लारीकर, शाहु महाराज गाढे, नाना तुळशीराम काकडे महाराज संतराम महाराज भोंडे, विलास मोरे, सुभाष गवळी महाराज, अशोक बर्डे, बजरंग काळे, रामदास काळे, एकनाथ काळे, ईश्वर अरुण पा. काळे, सौ. सुनिता अरुण काळे, आर. व्ही. चव्हाण, मनोज गोरे, भाऊसाहेब पाटील आदी आहेत.

Copyright ©