नॉन स्टॉप ६० मिनिट तिरंगा हातात घेऊन स्केटिंग
७५ वा स्वांतत्र्यचा अमृत मोहत्सव तसेच हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमाने
जय स्केटिंग क्लबच्या मुलांनी ६० मिनिटे नॉन – स्टॉप बिना थांबता हातात तिरंगा घेऊन स्केटिंग केली. याची दखल वर्ल्ड रेकॉड इंडिया यांनी घेऊन त्यांना मेडल तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात जवळ पास ५० मुला मुलीचा सहभाग नोदविला होता या कार्यक्रचे आयोजन जय स्केटिंग ब्लब चे संस्थापक प्रविण प्र. दिघाडे यांनी केले होते.
या कार्यमाचे उद्घाटन निवासी जिल्हा अथिकारी मा. ललित कुमार वऱ्हाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष होत. तसेच प्रमुख पाहुने मा. निलेश भगत व प्रविण तिरमारे ( माजी सैनिक ) व पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
