15 ऑगस्ट रोजी शिवशक्ती लॉन येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महारक्तदान शिबीर
यवतमाळ – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत एस.के. ऑटो डील मित्र परिवार व यवतमाळ शहरातील विभिन्न सामाजिक संघटनांच्या वतीने दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत शिवशक्ती लॉन यवतमाळ येथे 10 वे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रक्तदान शिबीरामध्ये विभीन्न सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थीनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबीरात स्वय्मस्फुर्तपणे सहभागी होणार असून प्रशासनातील गणमान्य अधिकारी गण पोलीस विभागातील कर्मचारी गण, या महारक्तदान शिबीरामध्ये सहभागी होणार आहे. तेव्हा या रक्तदान शिबीरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी यवतमाळकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन 10 व्या महारक्तदान शिबीराचे संयोजक शैलेश करिहार यांनी केले आहे.
