जिल्हा परिषद जवळील ट्रॅव्हल्स थांबा बंद करण्याची मागणी
जिल्हा अधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक तथा वाहतूक पोलिस निरीक्षक यांचे कडे तक्रार.
जिल्हा परिषद जवळील ट्रॅव्हल्स बस थांबा बंद करण्याची मागणी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडे निवेदना द्वारे मागणी करण्यात आली असुन याची त्वरित दखल घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे
यवतमाळ जिल्हापरिषद कार्यालया समोरुन यवतमाळ ते उमरखेड़ चालणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चा धुमाकुळ मागील अनेक वर्षंपासून सुरू आहे मिनी मंत्रालय म्हणून संबोधण्यात येत असलेल्या जिल्हा परिषद मध्ये संपूर्ण जिल्ह्यातील शेकडो लोकांची दर रोज ये जा असते सतत या ठिकाणी गर्दी राहते तर याच ठिकाणी दोन महाविद्यालय स्थित असुन हाजरो विद्यार्थी या महाविद्यालयात येत असल्याने यांचे जीवन धोक्यात आले आहे जिल्हा परिषद मध्ये येणारे,शाळकरी विद्यार्थी आणि आर्णी मार्ग सतत वर्दळीचा राहिलेला असल्याने यात भर पडली ती अवैध्य प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बस ची दर दहा मिनिटात ट्रॅव्हल या ठिकाणी येत असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते तर पायदळ चालणाऱ्या ना तर जीव मुठीत घेऊन चालावे लागते हा परिसर गजबजून असल्याने जिकडे तिकडे वाहनेच वाहने दिसते याची जिल्हा अधिकारी तथा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दखल घेऊन तातडीने जिल्हा परिषद जवळील ट्रॅव्हल्स थांबा हटविण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम कामठे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
