Home यवतमाळ निखिता राम राठोड बेचखेड यांची घरिच प्रसुती झाल्याने मुल दगावले

निखिता राम राठोड बेचखेड यांची घरिच प्रसुती झाल्याने मुल दगावले

10

निखिता राम राठोड बेचखेड यांची घरिच प्रसुती झाल्याने मुल दगावले

जिल्हा आरोग्य यंत्रणा ठरताहेत कुचकामी

बेलोरा( रुई ) प्राथामिक आरोग्य केंद्रा अंतर्गत बेचखेडा येथील आरोग्य विभागाच्या दुर्लक्ष पना मुळे एका महिलेची घरीच प्रसुती झाल्याने मुल दगवल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथे घडल्याने ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेचे जीवन धोक्यात आले आहे शासन गरोदर महिलेच्या आरोग्याची काळजी घेण्या करिता विविध यंत्रणा राबवित असूनही दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागत आहे बेचखेड येथील निखिता राम राठोड या महिलेची योग्य दखल न घेतल्याने हिची घरीच प्रसुती झाली वेळेवर कोणतेच उपचार न मिळाल्याने त्या महिलेचे शिशु जन्मतः मृत्युला सामोरे जावे लागले त्या शिशुस एका ऑटो मध्ये रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करीत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मावळ्यांची माहिती सांगण्यात येत आहे जिल्ह्यातील आरोग्य सेवा हि ढेपाळल्याने ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्याचे कोणत्याही प्रकारेचे नियंत्रण नसल्याने अनेक गावात साथरोग पसरत असल्याचे चित्र रुग्णालयात पहावयास मिळत आहे अनेक केंद्र दुपार नंतर ओस पडलेले दिसून येत आहे अनेक वेळा अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या त्यानाही गैर अनेक कर्मचारी गैर हजर आढळून आले मात्र कारवाई शून्य कुठे पाणी मुरते हे कळायला मार्ग नाही अशा परिस्थितीत सर्व सामान्याच्या जीवाशी खेळ होतोय या कडे प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे

Copyright ©