आर्णी जवळा सर्कल मधील युवासेनेला शेकडो युवासैनिकाचा जय महाराष्ट्र
आर्णी तालुक्यातील जवळा लोणी सर्कल मधील शेकडो युवासैनिकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांचे कडे राजीनामे सोपविल्याचे पत्र देण्यात आल्याने शेनेला मोठे खिंडार पडले राजेश हरीचंद्र राठोड जवळा लोणी सर्कल विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सोपविले यात युवराज दत्ता देवकर,सतीश आडे, अमोल पवार,मोहन जाधव,दिनकर राठोड,गोविंद राठोड, प्रभु पवार,संजय देवकर, सुभाष जिरे,संतोष माने, सुरज आडे,बंडू मिराशे,विनोद भरकडे, गजानन जाधव,मनोज पवार, ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन राठोड ,विनोद जाधव इत्यादि अनेक कार्यकर्त्यांनी संजयभाऊ राठोड यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
