महाराष्ट्र युवा खेळ परिषदेच्या
सचिव पदी राजा लांजेवार तर सहसचिव पदी बादल राठोड यांची निवड
महाराष्ट्र युवा खेळ परिषदेचे महासचिव प्राध्यापक पूरब सूर्यवंशी यांनी नियुक्तीपत्राद्वारे नरेन्द्र लांजेवार यांची महाराष्ट्र युवा खेळ परिषद YGCM महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा सचिव पदी तसेच बादल राठोड यांची यवतमाळ जिल्हा सहसचिव पदावर दिनांक 10 जुलै 2022 रोजी औरंगाबाद येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यामधील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मंडळींनी या संघटनेसोबत जोडावे असे आवाहन जिल्हा सचिव आणि सहसचिव यांनी केले आहे.
या संघटनेला क्रीडाविषयक केंद्र सरकारच्या 5 विभागांनी मंजुरी प्रदान केली आहे.
तालुका स्तरावर कार्यकारिणीची निवड करण्याची प्रक्रिया प्रगतीमध्ये आहे.
तरी इच्छुक खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच मंडळींनी आपली माहिती 9028455100 तथा 8888540549 या व्हॉट्सअँप नंबरवर तत्काळ पाठवावी.
ऑगस्ट महिन्यात तालुका आणि जिल्हा पातळीवरील स्पर्धा घेवून सप्टेंबर मध्ये राज्य पातळीवर तर ऑक्टोबर मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्याचे प्रस्तावित आहे.
या क्रीडा संघटन मार्फत खेळणाऱ्या स्पर्धकांना केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापनांमध्ये नीच्छितच प्राधान्य दिल्या जाणार आहे.
तरी याद्वारे आवाहन करण्यात येते की खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा. त्यासाठी आपली माहिती आपल्या व्हॉट्सअँप नंबर सह तत्काळ पाठवावी.
असे जिल्हा सचिव यांनी प्रसिध्दी परिपत्रका द्वारे आवाहन केले आहे.
