बोथ बोडण येथे १०१ वृक्ष लागवड संकल्प पूर्ण
हिवरी प्रती
उच्च प्राथमिक मराठी शाळा, बोथ बोडण व माझं गाव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १०१ वृक्षांचा वृक्षारोपण संकल्प सोहळा संपन्न झाला
यवतमाळ लगतच्या परिसरात प्रशस्त मैदान असलेली शाळा म्हणून उ. प्राथमिक शाळा, बोथ बोडण नावलौकिक आहे.शाळेच्या परिसरात हिरवळ व नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याकरिता माझं गाव फाउंडेशननी पुढाकार घेत १०१ वृक्षांची वृक्षारोपण केले.
सदर कार्यक्रमास राजेंद्र गावंडे,मुख्याध्यापक व
किशोर रणनवरे ,
चंद्रशेखर चौधरी ,
रुपेश हिवरकर संगीता गुप्ता ,
रीता गौतम , विशाला भरणे या शिक्षक वृंदाचा, शाळकरी विद्यार्थ्यांनी, व ग्रामस्थानी विशेष सहभाग नोदवला फाउंडेशन च्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला तर
१०१ वृक्षांचा संगोपण करण्याची जबाबदारी माझं गाव फाउंडेशन घेतली असल्याने भविष्यात शाळा सुंदर व स्वच्छ असेल व परिसरात हा निसर्ग रम्य असेल. हे स्वप्न साकार करण्याचा मनोदय माझं गाव फाउंडेशन नी केला आहे,तर वृक्षाची जोपासना करण्यासाठी याला तारेचे कुंपण घालून त्याचे सवरक्षण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
