Home यवतमाळ थकीत बिलासाठी जिल्ह्यातील दोन हजारांवर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

थकीत बिलासाठी जिल्ह्यातील दोन हजारांवर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

11

महावितरणची कारवाई

थकीत बिलासाठी जिल्ह्यातील दोन हजारांवर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

शनिवारी व रविवारी सुरू राहणार वीजबिल भरणा केंद्रे

यवतमाळ,दि.२४ जून २०२२: आवाहन करूनही वीज बिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील २ हजार १४७ ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. जून महिन्यातील वीज बिलाची ५३ कोटी रूपयाची विजबिलाची वसूलीही पुर्ण होतांना दिसत नसल्याने मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्यासह सर्व वरिष्ट अधिकारी वसूलीसाठी फिल्डवर उतरले आहे.

वितरीत करण्यात आलेल्या विजेच्या बिलाची नियमित आणि वेळेत वसूली होणे गरजेचे असते. परंतू वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांकडून विजबिल भरण्याला प्रतिसाद दिला जात नसल्याने दर महिन्याला थकबाकीत वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्याची विजबिलाची घरगुती,वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांची ५३ कोटी रूपयाची डिमांड असतांना मागील २४ दिवसात फक्त ३४ कोटी वसूल झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात थकबाकी आणि उर्वरित डिमांड वसूल करण्यासाठी महावितरणकडून वसूली मोहीमेला गती देण्यात आली आहे.या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने वीज ग्राहकांनी वीजबिलाची चालू तसेच थकबाकी भरून महावितरणची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

विजबिल भरण्याला प्रतिसाद देत नसल्याने जिल्ह्यात जून महिन्यात २ हजार १४७ ग्राहकाचा विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यापैकी १ हजार ८८ ग्राबकाचा विजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला असून १ हजार ५९ ग्राहकांचा विजपुरवठा कायमचा खंडित करण्यात आला आहे.

*शनिवारी व रविवारी सुरू राहणार विजबिल भरणा केंद्रे :-*

महावितरणकडून विजबिल वसूली मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहीमेदरम्यान विजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.त्यामुळे ग्राहकांना अंधारात रहावे लागू नये ,ग्राहकांची विजबिल भरण्याची सोय व्हावी यासाठी कार्यालयीन वेळेत महावितरणची अधिकृत विजबिल भरणा केंद्रे  उद्या शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली आहे.

याशिवाय विज ग्राहकांना  २४ × ७ सुरू असलेल्या  महावितरण मोबाईल एप, तसेच महावितरण www.mahadiscom.in या संकेत स्थळावरून विजबिल भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जनसंपर्क अधिकारी
महावितरण,अमरावती परिमंडळ

Copyright ©