आकोली प्रतिनिधी सचिन चावरे
भटक्या विमुक्त जाती जमाती आघाडीची बैठक स्तानिक भारतिय जणता पार्टी कार्यालय धंतोली वर्धा येथे संपन्न
दि.12जुन रविवारला भटक्या विमुक्त जाती जमाती आघाडी ची बैठक भारतिय जनता पार्टी कार्यालय धंतोली वर्धा येथे पार पडली.बैठकीला महारास्ट्र प्रदेश सहयोजक आमदार श्री नरेंद्र जी पवार यांच्या अद्यक्षते खाली प्रदेश सहयोजिका सौ.रश्मी ताई जाधव उपस्तीत होत्या तसेच विधर्भ सयोजिका जयश्रीताई राठोड,तथा भारतिय जणात पार्टी वर्धा जिल्हा अध्यक्ष सुनिल गफाट उपस्तीत होते.
बैठकीत विशेशतत्वाने भटक्या विमुक्त जाती जमातिचे लोक पूर्वीपासून गावाबाहेर बहुसंकेने मिळेल ते मोल मजुरिची कामे किवा करागिरी करत असे तसेच त्यांच्या मालमत्तेची किवा मुलाबाळाची जन्माची किवा मृत्युची कुठल्याही प्रकारे नोद घेतल्या जात नसे मात्र नविन पिढीची गावाबाहेर राहुनही शिक्षणाची ओढ असल्याने शिकुन सुशिक्षीत झाली असली तरी शाषन दरबारी नोकरी नाही तसेच त्यांना ओळखपत्र मिळणे तर दूरच त्याना जातीचे प्रमाण पत्र सुधा मिळत नसे,त्यांना राशन कार्ड मिळत नसे जात पडताळणी प्रमाण पत्र व्यालिडीती मिळायला हवी या सारक्या अनेक समस्या आपन भटक्या विमुख्त जाती जमातीच्या संघटनेतून अपण सोडऊ व या संघटनेच्या माद्यमातून आपन कामला लागू असे आमदार नरेंद्र पवार यांच्या भाषणातून सांगण्यात आले.भटक्या विमुक्त जाती मधे वडार,बेलदार,भोई ,बंजारा,गवळी ,कैकाडी,धनगर अश्या अनेक जाती मोडत असुन या संघटनेच्या माद्यमतुन संघटन मजबूत करुन आपन सर्व कामाला लागू असेही त्यानी सांगितले तसेच सुनिल गफाट यानी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले
त्यासाठी जिल्हा स्तरावर वा जिल्हा अधिकारया कडे पाठ पुरावा करुन वंचितानचे विषय मार्गी लावण्यासाठी भटक्या विमुक्तानचे संघटन करुन त्यांना जागरुक करण्याचे काम महारास्ट्र प्रदेश भाजपा विमुक्त आघाडीने सुरु केले आहे असे मंचाकडून सागंन्यात आले.
बैठकीला भाजपा विमुक्त आघाडीचे जिल्हाद्यक्ष श्री मनिष बोपटे जिल्हा संघटन महामंत्री मोरेश्वर गळहाट,मिडिया प्रमुख श्री.सचिन चावरे तसेच महिला
अद्याक्ष सौ.जयश्रीताई शंकरवार,प्रभारी शितलताई डोंगरे ,प्रगतीताई शंकदवार,रंजना दुर्गे ,अपर्ना शंकदवार लीला पवार,कविता शंकदवार,अर्जुन चव्हाण ,प्रल्हाद दंडगे ,दशरथ भुजाडे,गजेन्द्र कापडे,अमोल कालोकार,नंदकीशोर गळहाट,सुनिल ऊपासे,नागोभाऊ यांच्यासह मोट्या संखेने कार्यकरते व पदाधिकारी उपस्तीत होते.
