Home यवतमाळ दिग्रस येथे विशाल जनसागराच्या साक्षीने ३१ जोडपिंचा विवाह थाटात संपन्न

दिग्रस येथे विशाल जनसागराच्या साक्षीने ३१ जोडपिंचा विवाह थाटात संपन्न

32

दिग्रस येथे विशाल जनसागराच्या साक्षीने ३१ जोडपिंचा विवाह थाटात संपन्न

मुस्लीम गवळी समाज सामूहिक विवाह मेळाव्याला
सर्वपक्षीय पुढारी व सर्वधर्मीय बांधवांची मोठ्या संख्येने हजेरी

दिग्रस येथे मुस्लीम गवळी समाज सामूहिक विवाह मेळाव्यात आज { ता.८ }तब्बल ३१ जोडपी विवाहच्या पवित्र बंधनात अडकले . यावेळी नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी असंख्य सर्वपक्षीय व सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते. दिग्रस येथील गवळीपुऱ्याला लागून असलेल्या महेबूबनगर येथे उभारण्यात आलेल्या भव्य मांडवात सकाळी १० वाजता अत्यंत सध्या पद्धतीने ३१ निकाह पार पडले . विशेष म्हणजे मुस्लीम गवळी समाज मागील १७-१८ वर्षांपासून सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करत असून आजपर्यंत तब्बल ६५५ लोकांचे संसार थाटण्यात त्यांना यश आले आहे . दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गरीब असो की श्रीमंत , वर्षभर कोणीही एकट्याने विवाह करत नाही . शंभर टक्के समाज बांधव दरवर्षी सामूहिक विवाह मेळाव्यातच आपल्या पाल्यांचे लग्न उरकवतात .
सदर सामूहिक विवाह मेळाव्यात निकाहची संपूर्ण कार्यवाही मौलवी सादिक आलमगिरी , मौलवी युनूस साहब , मौलवी असलम साहब , मौलवी अल्ताफ साहब , मौलवी इसहाक साहब , हाफिज अश्फाक साहब, हाफिज इसराईल साहब,हाफिज साजिद,हाफिज जुबेर, हाफिज सलीम आदी उलेमांनी पार पाडली .
यावेळी आमदार व माजी वन मंत्री संजय राठोड , ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे , माजी मंत्री संजय देशमुख , भजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र अरगडे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर जाधव , माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग , शाम पाटील , नूर मुहम्मद खान , जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख , जिल्हा सरचिटणीस राजा चौहान , पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे , सलीम पटेल , भारत देशमुख , शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर , शहर प्रमुख राहुल देशपांडे , डॉ मनोज टेवरे , डॉ संजय बंग , केतन रत्नपारखी , विनायक दुधे , जावेद पहेलवान , विजय घाटे , जावेद पटेल , दिनेश सुकोडे , राजकुमार वानखडे , गोपाळ राठोड , प्रणित मोरे , गोपाळ शाह , सैयद अकरम , महादेवराव सुपारे,अजिंक्य मात्रे,वाशीम जिल्हा गवळी समाज संघटना जिल्हाध्यक्ष जुम्मा भाई पप्पुवाले आदी सर्वपक्षीय , सर्वधर्मीय बांधव , वर व वधूकडील अमरावती , अकोला , बुलढाणा , खामगाव , चिखली , बडनेरा , मंगरुळपीर , कोलंबी येथील हजारो पाहुणे उपस्थित होते . मुस्लीम गवळी बिरादारीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला .

Copyright ©