बसस्थानकातील शौचालयाची स्वच्छता करा,विभाग नियंत्रकांना संकल्प चे निवेदन
स्थानिक यवतमाळ शहरामध्ये नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे,त्यामुळे आर्णी मार्गावर विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानकाची वाहतुकीसाठी व्यवस्था केलेली आहे,सार्वजनिक वाहतुकीचे व वर्दळीचे हे ठिकाण असल्यामुळे प्रवाशांची तोबा गर्दी ह्या ठिकाणी असते,कोरोना काळात संवेदनशील क्षेत्र म्हणून सुद्धा बसस्थानाकडे बघितले जायचे,मागील सहा महिन्यांपासून एस टी चा संप सुरू असल्यामुळे प्रवाशांची वर्दळ कमी झाली होती परंतु आता एस टी परत धावायला लागल्यामुळे प्रवाश्यांची गर्दी वाढलेली आहे,यवतमाळ बसस्थानकामधील शौचालय मात्र घाणीचा सामना करतांना आढळले आहे,महिला प्रसाधन व पुरुष प्रसाधनाची इतकी दुरवस्था आहे की आतमध्ये पाय सुद्धा ठेऊ शकत नाही,दारूच्या बाटल्या,प्लास्टिक ने झालेली।प्रसाधनाची कोंडी ह्यामुळे प्रवाश्यांना आतमध्ये प्रवेश सुद्धा करता येत नाही पर्यायाने सर्व प्रवासी आजमितीस परिसरात शौचास बसून परिसरात घाण पसरवतात जे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे,त्यातही कोरोना अजूनही डोकं वर काढत आहे,ह्या वर तोडगा निघावा ह्याकरिता संकल्प फाउंडेशन च्या वतीने आज विभाग नियंत्रक श्री जोशी ह्यांना निवेदन।देण्यात आले।असून प्रसाधन गृहाची संबंधित कंत्राटदाराकडून लवकरात।लवकर स्वच्छता करून।घ्यावी व होणाऱ्या त्रासातून प्रवाश्यांना मुक्ती द्यावी जेणेकरू बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरणार नाही,हे निवेदन संकल्प फाउंडेशन चे शहराध्यक्ष विनोद दोंदल ह्यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले ,ह्यावेळी त्यांचे सोबत जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस वसंत शेळके,रमेश राऊत,उपाध्यक्ष अनिल तांबेकर,सहसचिव रवि माहुरकर,कोशाध्यक्ष मनीष इसाळकर,कार्यक्रम प्रमुख नितेश यादव,जिहा कार्यकारिणी सदस्य रवी ठाकूर,राजू गावंडे उपस्थित होते
