हिवरी येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ
हिवरी येथे 3 एप्रिल पासुन राधा श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ ह. भ. प. सौ शोभाताई गावंडे यांच्या अमृत मय वानिमधून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे 3 एप्रिल सकाळी ११ वाज.कलश पूजन व भागवत कथेस प्रारंभ करण्यात येणार आहे,४ एप्रिल ह भ. प. पांडुरंगजी गावंडे सेलोडी ता.दारव्हा भजन,५ एप्रिल भांब (राजा )येथील पसारे महाराज यांचे भारुड,महिला भजनी मंडळ,गुरुदेव भजनी मंडळ हिवरी यांचे भजन ८ एप्रिल अक्कावार गुरुजी महाराज आर्णी यांचे कीर्तन,गजानन भजनी मंडळ हिवरी यांचे भजन तर गोपाल काल्याचे कीर्तन वेसंमुक्ती सम्राट ह.भ. प.मधुकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन १० एप्रिल ला ग्रंथ पूजन दिंडी,वृक्ष दिंडी आणि गावात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे तर संपूर्ण गावास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
