Home यवतमाळ शेतकर्यानी शेतीसोबत जोडव्यावसाय दुग्धपालन करावा-डॉ. ओम शिंदे

शेतकर्यानी शेतीसोबत जोडव्यावसाय दुग्धपालन करावा-डॉ. ओम शिंदे

13

शेतकर्यानी शेतीसोबत जोडव्यावसाय दुग्धपालन करावा-डॉ. ओम शिंदे

बळीराम पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालययात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पशूवैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पशुधन विकास अधिकारी डॉ. ओम शिंदे हे होते. प्रसंगी बोलताना ते म्हणाले की,”शेती सारख्या पारंपरिक व्यवसायासोबात जोडधंदा करावा, त्यामध्ये सुधारित दुबत्या जनवराची संख्या वाढली तर शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण कमी होईल. पुढे बोलताना म्हणाले की, पशु ची चिकित्सा करण्यासाठी शेतकऱ्याच्या सेवेत तत्पर आहोत असे ते म्हणाले. प्रसंगी डॉ. गणेश खुपसे पशधन पर्यवेक्षक डॉ. सुदिन घुले, शिवराम बामणे सेवादाता,रासेया कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने मंचावर उपस्थित होते.
या शिबिरात गाई-म्हैस सारख्या पाळीव प्राण्यावर शस्त्रक्रिया, वंधत्व तपासणी, गर्भातासणी करण्यात आली. तसेच खच्चीकरण, जन्तनाशक,औषधोपचार करुन जनावराची तपासणी केली.या प्रसंगी गावातील सरपंच माधव मेश्राम, आदित्य शिंदे, अशोक रामराव शिंदे, भाऊसाहेब गिधाडे, उमराव मुंडे या सारखे प्रतिषठ नागरिक उपस्थित होते.
पशुवैद्यकीय शिबिर यशस्वी करण्यासाठी बजरंग जेपूरकार,निखिल खारटे, करण वर्मा, ,गणेश धोतरे, अरुण राऊत, मंगेश सोनुले, आकाश मांजरमकर , शुभम मांजरमकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.शेषराव माने यांनी केले,तर उपस्थितीचे आभार प्रा. येरडलावर यांनी मानले.

Copyright ©