Home यवतमाळ २० फेब्रुवारीला शरद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर शरद गट ग्रामपंचायत,क्रिस्टल डायग्नोस्टिक...

२० फेब्रुवारीला शरद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर शरद गट ग्रामपंचायत,क्रिस्टल डायग्नोस्टिक सेंटरचे आयोजन

32

२० फेब्रुवारीला शरद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
शरद गट ग्रामपंचायत,क्रिस्टल डायग्नोस्टिक सेंटरचे आयोजन

यवतमाळ : समाजाचं काही देणं लागतं ही उदात्त भावना यवतमाळच्या डॉक्टरांनी बाळगली आहे. येत्या २० फेब्रुवारीला तालुक्यातील शरद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात हृदयरोग, मेंदूरोग, दंतरोग, स्त्रीरोग,नाक,कान, घसा, व हाडांच्या विविध आजरांवर रुग्णांची तपासणी व औषधी दिली जाणार आहे.
शहरापासून जवळच असलेल्या शरद गट ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी ११ ते २ या सुमारास शिबिर घेतले जाणार आहे. याप्रसंगी हृदयरोग, मधुमेह तज्ञ डॉ. अरुण जनबंधू,अस्थिरोग तज्ञ डॉ. सुदर्शन कांबळे, दंत व मुखरोग तज्ञ डॉ.प्रशांत तामगाडगे, शल्य चिकित्सक डॉ.अजोनिश कांबळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रजनी कांबळे व कान, नाक घसा तज्ञ डॉ.स्नेहा राठोड ह्या रुग्णांची मोफत तपासणी करणार आहे. ग्रामीण भागात बहुतांश नागरिक अनेक आजार घेऊन जीवन जगतात. योग्यवेळी आजार ओळखता न आल्याने त्यांच्यात अडचणी वाढतात. हीच बाब लक्षात घेऊन गट ग्रामपंचायत शरद व क्रिस्टल डायग्नोस्टिक सेंटरने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.या शिबिरात नागरिकांनी संपूर्ण आजारांची तपासणी करून घेता येणार आहे . कोरोना त्रिसूत्रीचे पालन करून या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शरदच्या सरपंच वंदना लिलारे,उपसरपंच अमोल रामटेके , ग्रामसेवक विशाल नांदेकर, क्रिस्टल डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ.सुशील वानखडे, डॉ.नीलेश बिटे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल सुर्यतळ, ग्रा.पं सदस्य मुक्ता धनेस्कर,दुर्गा चापडोह, तुकाराम चापडोह, चंद्रकांत राऊत, प्रतिभा शेंडे, वर्षा भगत, मनीष बन्सोड, मुख्याध्यापक अनिल देशमुख, आरोग्य सेवक प्रीतम डोंगरे,आरोग्य सेविका कु. जया नगराळे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर लिलारे, राम धनेस्कर, पोलीस पाटील राजू शेंडे, नवयुवक भीम शक्ती मंडळ शरद, चिराग महिला ग्रामसंघ शरद, फुलचंद धनेस्कर, मनोहर मेश्राम, अनिल बन्सोड, दिलीप मेश्राम, गोविंदा रामटेके ,हुनुवंत बोरकर,अमोल शेंडे,अशोक पाळेकर, देविदास लिलारे,अंबादास देवतळे ,शरद,मोहदरी,पोफळणीआशा सेविका,अंगणवाडी सेविका, सचिन पिपळे ,गजानन भगत, ग्रा.प .कर्मचारी प्रकाश भगत,कुणाल खोब्रागडे ,मनोज मेश्राम,सुरज रामटेके ,शुभम कुमरे यांनी केले आहे.

Copyright ©