Home यवतमाळ विद्युत करंट ने झडशी च्या युवकाचा अपघाती मृत्यू

विद्युत करंट ने झडशी च्या युवकाचा अपघाती मृत्यू

13

 प्रतिनिधी आकोली सचीन चावरे.

विद्युत करंट ने झडशी च्या युवकाचा अपघाती मृत्यू

शेतात लागून असलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने झडशी येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मौजा खैरी शिवारात आज सकाळी 7 वाजता उजेडात आली.मृतक युवकाचे नाव हरिदास नामदेवराव काळे वय 41 रा.झडशी असे आहे.
मृतक हा बांधकाम करून शेती ठेक्याने करीत होता.त्याने मौजा खैरी शिवारात ठेक्याने शेती केली होती.काल सायंकाळी 7 चे सुमारास तो मुक्कामाचे उद्देशाने शेतात गेला होता .विद्युत पुरवठा रात्री 11 वाजता सुरू होत असल्याने विद्युत करंट लागल्याची घटना ही रात्री 11 नंतर घडली असावी , असा अंदाज आहे.आज सकाळी 7 वाजता त्याचा मृतदेह मृत अवस्थेत शेजारच्या शेतकऱ्यांना दिसला.जंगली जनावरांचा बेसुमार त्रास असल्याने मृतकानेच शेतात विद्युत पुरवठा सोडला होता.घटनेची माहिती प्राप्त होताच सेलू पोलिसांकडून पी एस आय कंगाले, विजय कापसे, रवींद्र रघाटाटे, वणवे व गजानन वाट यांनी घटनास्थळी जाऊन घटना स्थळाचा पंचनामा केला.व शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला.घटने मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.मृतकाचे मागे पत्नी 1 मुलगा व 1 मुलगी आहे .

Copyright ©