जावेदभाई अन्सारीचे देवपण व संकल्प फाऊंडेशनचे मोठे पण !
जावेदभाई हे नेहमीच जनसेवेत रहात असल्याने अनेकांच्या आशा जावेदभाई यांच्यावर अवलंबून असते गोरगरीब दिन दुबळ्यांना मदती करीता सरळ हाताने मदत करीत असल्याचे सतत चर्चिल्या जाते ,कधीही जात पात धर्म न पाहता जनसेवा हिच ईश्वर सेवा माननाऱ्या या देवदुतास अनेकांनी आशिर्वाद देताणाचे अनेक उदाहरण पहावयास मिळाले अशीच एक घटना घडली एक नावविवाहित तरुणीचे अपेन्डीक्स चिकित्सा स्थानिक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने रुग्णाला हृदय विकाराचा झटका येऊ शकतो,तुम्ही सावंगी मेघे ला हलवा असा निर्णय दिल्यामुळे सासु आणि तिच्या पतीची तारांबळ उडाली,अशातच संकल्प फाउंडेशन ला एक फोन आला,आणि लगेच त्यांनी निर्णय घेतला व सेवा रग्नालय भोसा रोड ला रुग्णाला हलविले,लगेच उपचार सुरू करण्यास डॉक्टर ला सांगतास इको नॉर्मल,उर्वरित चाचण्या नॉर्मल,आल्या नंतर डिस्चार्ज च्या वेळेस ह्या कुटुंबाजवळ एक रुपया सुद्धा नसल्याने अश्यातच प्रलय ट्रीपलरवार यांनी जावेद भाऊना फोन केला भाई मुझे आपकी मदद चाहीए आणि इती वृतांत सविस्तर सांगितला,जावेद भाई नागपूरला असल्याचे कळले,जावेद भाईंनी रुग्णालयात आलेला संपूर्ण खर्च दिला आज संकल्प फाउंडेशन च्या वतीने पूजा बावणे ला मायेचा आधार देत सोबत फळे दिली या वेळी संकल्प फाउंडेशन चे सहसचिव रवी माहुरकर व मनीष इसाळकर होते जावेद भाईंच्या तत्पर मदतीला संकल्प फाउंडेशन नी मानाचा मुजरा केला तर दोघांनीही सामाजिक बांधिलकी जपली हे विशेष.
