Home यवतमाळ यवतमाळ च्या १० स्केटर्स ची महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड.

यवतमाळ च्या १० स्केटर्स ची महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड.

26

यवतमाळ च्या १० स्केटर्स ची महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड.

र्शिडी च्या राज्य स्तरीय स्पर्धेत जिंकलित २० पदके.

म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र च्या अनुषंगाने नुकतीच र्शिडी येथे २ दिवसीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धा पार पडली. जय स्केटिंग अकॅडमी च्या १० स्केटर्स नी ह्या राज्य स्तरीय स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन करीत १० पैकी १० स्केटर्स नी २० पदके पटकावित महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

ह्या राज्य स्तरीय स्केटिंग स्पर्धेत जय स्केटिंग अकॅडमी च्या पदक जिंकलेल्या सर्व १० स्केटर्स ची निवड राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी झाल्याने जिल्ह्याची मान उंचावली आहे

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा १२ व १३ फेब्रुवारी २०२२ ला गोवा येथे आयोजित आहे.

राष्ट्रिय स्केटिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झालेले स्केटर्स
शिवंश बोरकडे ८ वर्ष,तिर्थ कानतोडे ८ वर्ष, स्वामी जयसिंगपुरे ८ वर्ष,पार्थ चव्हाण ८ वर्ष,कु. गाथा चोपडे ८ वर्ष
,प्रज्वल जुनघरे ११ वर्ष, रुद्र पवार ११ वर्ष,ओम तिरमारे ११ वर्ष, यश पवार १४ वर्ष, रुदशं दुधाटे १४ वर्ष या स्पर्धकांचा समावेश करण्यात आला
सर्व यशस्वी स्केटर्स आपल्या यशाचे श्रेय आपले आई बाबा व कोच प्रविण प्र. दिघाडे ह्यांना देतात.

जय स्केटिंग अकॅडमी च्या सर्व विजयी व महाराष्ट्र संघात निवड झालेल्या स्केटर्स चे यवतमाळ वासियांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे

Copyright ©