Home यवतमाळ घाटंजीत विविध ठिकाणी आई रमाई जयंती उत्साहात साजरी

घाटंजीत विविध ठिकाणी आई रमाई जयंती उत्साहात साजरी

7

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

घाटंजीत विविध ठिकाणी आई रमाई जयंती उत्साहात साजरी
———————————————
घाटंजी-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातआम्रपाली बुद्ध विहारात आई रमाई यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.
त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन व्याख्यानास शहरातील सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरीता रंजित नगराळे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून सुनीती विजय सिसले, मनीषा महेंद्र देवतळे उपस्थित होत्या.
विशाखा महीला मंडळ घाटंजी यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना रमाई चा त्याग व भारतीय महिला या विषयावर मनिषा महेंद्र देवतळे यांनी रमाई ही त्यागाची मूर्ती आहे व तीच्या त्यागाने बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातुन समाज चळवळ उभी राहिली व समाज क्रांति घडून आली हे सांगीतले. तर अध्यक्षा सरीता रंजित नगराळे यांनी रमाई ही एक व्यक्ती नसुन तो एक विचार आहे, स्त्री ची उर्जा आहे. त्यांचे अनुकरण सर्व समाजातील प्रत्येक स्त्री ने केले पाहिजे असे सांगितले.
विशाखा महीला मंडळ घाटंजी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रमाई अभिवादन कार्यक्रमास संघपाल कांबळे, सुभाष मुनेशवर, बाबाराव भगत, गुलाबराव सिसले, एन जी भगत, अशोक खरतडे, अनिल रामटेके, संजय कांबळे, रावी नगराळे, विरेंद्र पिलावन, संतोष जिवने, विजय सिसले, सुनिल नगराळे, सुरेश हुमे, मोहन बागेशवर, किशोर मुनेश्वर, मोहन बागेश्वर, बाबाराव भगत ,सुरज रामटेके, विजय रामटेके, अनिल रामटेके, विशाखा महीला मंडळाच्या सर्व भगीनी या प्रसंगी उपस्थित होते.
या वैचारिक व्याख्यान माला सत्राचे प्रस्ताविक सुनिती सिसले
संचालन सोनु तामगाडगे व आभार पुनम मानकर यांनी केले
……….

युवा पुरोगामी विचामंच

आई रमाईच्या १२४ वी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन युवा पुरोगामी विचारमंचचे अध्यक्ष भाविक भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, कवी, साहित्यिक भारत लढे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून मोरेश्वर वातीले, मधुकर निस्ताने व प्रमुख पाहुणे म्हणून बाबू बोंद्रे, नाझी खान, शोभा अलोने, ममता वेट्टी, संतोष जीवने, प्रफुल राऊत आदी होते.

सर्वप्रथम आई रमाईच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दिपबत्ती प्रज्वलीत करण्यात आली. प्रसंगी प्रमुख वक्ते मोरेश्वर वातीले यांनी
रमाई चा त्याग आणि बाबासाहेबाना खरी साथ रमाईंची होती. त्यामुळे बाबासाहेब यशाचे उंच शिखर गाठू शकले. जातीत कोणताही उत्सव साजरा न करता सर्वानी एकत्रितपणे साजरा करावा असे मत व्यक्त केलं. मधुकर निस्ताने यांनी सुद्धा रमाई च्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत लढे यांनी चळवळीत असलेली स्थिती, रमाई यांचा जन्म, त्याग, बाबासाहेब यांच्या जीवनात रमाईचे महत्व व आजच्या स्त्रीने रमाईचा आदर्श घेणे काळाची गरज आहे. युवकांनी व महिलांनी ह्या कार्यक्रमात पुढाकार घेऊन सक्रियपणे कार्य करण्यास पूढे यावे असे आवाहन केले. रमाई यांच्या जीवनावर आधारित गीत शोभाताई अलोणे यांनी सादर केलं.

सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रदीप रामटेके, संजय टिपले, अजय गजभिये, सचिन काळे, संतोष ओंकार, उमेश घरडे, शेंडे सर, कांबळे काका, विष्णू भाऊ यांची होती.

कार्यक्रमात वंदना सरणय गाथा आणि प्रास्ताविक बौद्धाचार्य संतोष जीवने यांनी केलं.
कार्यक्रमाचे संचलन भाविक भगत तर आभार प्रफुल राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रफुल राऊत, भाविक भगत, उमेश घरडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला असंख्य बौद्ध उपासक व उपसिका उपस्थित होते.
………

त्रिरत्न बुद्ध विहार खापरी

येथे “समर्पिता माता रमाई गांची १२४ वी जयंती परीसरातील सर्व बंधू भगिनी विहारात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

रजनी रवी इंगळे यांनी भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून वंदन केले तसेच माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पमाला वाहून वंदन केले. त्यानंतर आर्या विशाखा यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशिल दिले. प्रसंगी सरीता नगराळे, पूष्पा शेंडे, युग तेलंग यांनी आई रमाईच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. मुद्रिका भजगवरे यांनी रमाइवर गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र वानखडे व आभार राजेश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला उत्सवसमती – अध्यक्ष किसन कांबळे, देवकुमार शेंडे, अरुण अलोणे, प्रमोद भजगवरे, सुभाष गजभिये, अशोक करमनकर व मनोहर चांदेकर सह परीसरातील असंख्य उपासक उपस्थित होते.

Copyright ©