Home यवतमाळ डॉ. प्रा. मिनाक्षी सावळकर यांच्या कार्याच्या नियोजनाची दखल घेत गौतमबुध्द नगर नोयडा...

डॉ. प्रा. मिनाक्षी सावळकर यांच्या कार्याच्या नियोजनाची दखल घेत गौतमबुध्द नगर नोयडा चा अतिरिक्त प्रभार.

10

डॉ. प्रा. मिनाक्षी सावळकर यांच्या कार्याच्या नियोजनाची दखल घेत गौतमबुध्द नगर नोयडा चा अतिरिक्त प्रभार.
———————————————
यवतमाळ- आगामी काळात उत्तर प्रदेश मध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुका करिता महाराष्ट्र काँग्रेस कमिटी महिला असंघटित कामगार महिला बचत गटाच्या राज्य समन्वयक डॉ. प्रा. मिनाक्षी सावळकर यांची उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या दृष्टीने दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेत यवतमाळ येथील डॉक्टर प्रा. मिनाक्षी सावळकर यांच्या कार्याचे नियोजन पाहता गौतमनगर नोयडा सेक्टर ६२,६३ चा अतिरिक्त प्रभार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्ष नेट्टा डीसुज्वाजी व राष्ट्रीय महिला सचिव डॉ. साई अनामिका झा यांनी एका पत्राद्वारे अतिरिक्त प्रभार सोपविला.
महाराष्ट्र कांग्रेस कमिटीच्या असंघटित कामगार महिला बचत गटाच्या राज्य समन्वय या पदाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी उत्कृष्ट संघटन पक्षासाठीचे कार्य सर्वसामान्यांसाठी त्यांची तळमळ, कार्याचे अभ्यास पूर्वक नियोजन याचीच दखल घेत पक्षाने त्यांचेकडे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केले होते. मात्र दिनाक २८ जानेवारी रोजी झालेल्या सभेत त्यांची कार्यप्रणाली पाहून पक्ष श्रेष्ठींनी गौतमनगर नोयडा येथिल अतिरिक्त प्रभार सोपविल्याने यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस मधील त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद संचारला असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©