Home यवतमाळ एल. एल. एम. मध्ये आसावरी काळे नागपूर युनिवर्सिटी मधून प्रथम.

एल. एल. एम. मध्ये आसावरी काळे नागपूर युनिवर्सिटी मधून प्रथम.

20

एल. एल. एम. मध्ये आसावरी काळे नागपूर युनिवर्सिटी मधून प्रथम.
———————————————
यवतमाळ-गवळी समाजातील, एका प्राथमिक शिक्षकाची मुलगी कु. आसावरी श्रीकांत काळे हिने जिद्द व चिकाटी उराशी बाळगून एल. एल. एमच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवित नागपूर युनिवर्सिटी मधून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
सुरुवाती पासूनच शिक्षणाची जिद्द बाळगणाऱ्या आसावरी हिचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण पांढरकवडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. वडील शिक्षक असल्याने तिला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. भविष्यात उच्च शिक्षण घेवून समाजात जनजागृती करण्याचा मनाशी बाळगून त्यांनी कायदे विषयक क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले. आणि जिद्द व चिकाटी अंगिकारून अभ्यास केला. यात तिच्या मेहनतीला घवघवीत यश मिळाले असून टॉपर येवून नागपूर युनिवर्सिटी मधून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला त्यामुळे त्यांचा सर्वत्र स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यातून गवळी समाजातील विद्यार्थ्यांना सुध्दा एक प्रेरणा मिळणार आहे. त्या आपल्या यशाचे श्रेय मोठी बहीण, आई वडील व त्यांच्या जीवनातील पहिल्या वर्ग शिक्षिका जयश्री पांगारकर मॅडम यांना देत असून यापुढेही आपला अभ्यासक्रम सुरू राहणार असून मनाशी बाळगलेले ध्येय गाठनार असल्याचे सांगितले.

Copyright ©