आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम
एक दिवसीय मोफत” ई”
श्रम कार्ड शिबिराचे आयोजन
समाजसेवक छोटू भाऊ पुनवटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आर्णीतील प्रभाग क्रमांक ७ मधील १६ ते ५९ वर्षे वयोगटातील महिला पुरुष तसेच तरुणांसाठी एक दिवसीय ई श्रम कार्ड बनवण्याची संकल्पना माजी बांधकाम सभापती जावेद आमिन सोलंकी यांनी पार पाडली.
कोणत्याही कामासाठी लागणारे साहित्य, स्वयंरोजगारासाठी साह्य ता , शिक्षणासाठी आर्थिक मदत, मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत वीजबिल सबसिडी, मातृत्व लाभ तसेच कोणत्याही प्रकारच्या उपचारासाठी लागणारी मदत या कार्ड मार्फत केंद्र सरकार द्वारे देण्यात येते करिता गरजूंसाठी हे एक दिवसीय शिबीर घेण्यात आले आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर घेऊन गरजूंना कार सुट्टीत सुद्धा देण्यात येणार आहे ह्या शिबिरात करिता जावेद भाई सोलंकी माजी बांधकाम सभापती आर्णी यांनी नियोजन केले तसेच शेख युनूस, सुजित पाटील, सागर वंजारे ,क्षी तिज भगत कमलेश खरतडे संदेश, भगत विनोद, मनवर यांनी सुद्धा परिश्रम घेतले. ह्या शिबिरामध्ये सकाळी दहा१० वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जवळपास 250 गरजूंना लाभ घेता आले.
